Buldhana-hoping-for-major-funds-in-budget-2026 : अर्थसंकल्पात बुलढाण्याला नेमकं काय? घोषणा की ठोस निधी?
Buldhana राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना बुलढाणा जिल्ह्याच्या वाट्याला नेमके काय येणार, हा कळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घोषणा आणि आश्वासनांच्या पलीकडे जाऊन ठोस निधी मिळणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सुमारे ४५ टक्के फळबाग क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. २०२३ मध्ये जाहीर झालेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प अजूनही कागदावरच का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. प्रक्रिया उद्योग, शीतसाखळी आणि निर्यात सुविधा उभारल्याशिवाय दरघटीचा फटका थांबणार नाही, हे स्पष्ट असतानाही अंमलबजावणीत विलंब का, याचे उत्तर सरकार देणार का?
सिंचनाच्या बाबतीत जिगाव धरण हा जिल्ह्याचा जीवनदायिनी प्रकल्प मानला जातो. अनेक वर्षे रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी यंदा भक्कम तरतूद होणार का, की पुन्हा आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार? त्याच प्रमाणे वेन गंगा पैन गंगा या महत्त्वाकांक्षी योजनेला निधी आणि प्रशासकीय गती मिळाली, तरच दीर्घकालीन जलसुरक्षा शक्य आहे.
OBC morcha : “पुतळ्याचा वाद नव्हता, महिलांचे कपडेही फाडले नाहीत
दरम्यान, समृद्धी महामार्ग लगत औद्योगिक संधी उभारण्याची चर्चा वर्षानुवर्षे सुरू आहे. सावरगाव माळ व मेहकर परिसरात कृषी-आधारित औद्योगिक हब उभारणीसाठी स्पष्ट आराखडा आणि निधी जाहीर झाला नाही, तर ही संधीही हुकण्याची भीती व्यक्त होत आहे.








