Breaking

Buldhana BJP : भाजप मंडळ अध्यक्ष निवडीच्यावेळी बाचाबाची,

Controversy during the election of BJP board president : देऊळगाव राजा येथे पक्ष निरीक्षकांसमोरच वाद

Buldhana भारतीय जनता पार्टीच्या देऊळगाव राजा तालुका मंडळ अध्यक्ष निवडीच्या वेळी पक्ष निरीक्षक व कार्यकर्त्यांमध्ये थेट वाद झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला. बैठकीतील बाचाबाची पक्ष निरीक्षकांसमोरच झाल्यामुळे भाजपच्या अंतर्गत शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२० एप्रिलला राज्यभरात भारतीय जनता पार्टीकडून मंडळ अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत होता. त्यानुसार सिंदखेडराजा मतदारसंघासाठी पक्ष निरीक्षक मोहन शर्मा आणि सहनिरीक्षक देविदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Water shortage : डोक्यावर हांडा, पाण्यासाठी हिंडा!

गेल्या आठवड्यात देऊळगाव राजा येथील जालना बायपासवरील हॉटेल सुरुची भोज येथे तालुका अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडत असताना, एका नवख्या कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आल्यामुळे उपस्थित जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या निवडीविरोधात काही कार्यकर्त्यांनी थेट निरीक्षक पाटील यांच्यासमोरच नाराजी व्यक्त करत जोरदार बाचाबाची केली. यात जुने पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले.

घटनास्थळ हे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांचे होम ग्राउंड असूनदेखील अशा प्रकारचा वाद उफाळल्यामुळे त्यांच्यावरही पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत. विभागीय निरीक्षक आमदार रणधीर सावरकर यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले असून, प्रभारी मंत्री आकाश फुंडकर यांनीही या प्रकरणावर भाष्य केलेले नाही.

Sonia & Rahul Gandhi: सरकारचं अपयश झाकण्यासाठीच ‘ईडी’चा आधार

सिंदखेडराजा मतदारसंघात तरुण आमदार मनोज कायंदे यांचा पक्षावर प्रभाव असून, त्यांच्यासोबत तरुण कार्यकर्त्यांचे मोठे समर्थन आहे. त्यामुळे देऊळगाव राजा व सिंदखेडराजा मंडळांमध्ये नियुक्त केलेले अध्यक्ष पक्षाच्या धोरणाशी कितपत सुसंगत आहेत, यावरही शंका व्यक्त केली जात आहे.