Vijayraj Shinde is the new district president of BJP : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपकडून मोठी जबाबदारी
Buldhana बुलढाण्याचे माजी आमदार आणि सध्या भाजपाचे लोकसभा निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत असलेले विजयराज शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने ही नियुक्ती जाहीर केली आहे. घाटाखाली सचिन देशमुख यांचीही जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
विजयराज शिंदे हे एकसंघ शिवसेना असताना 1995, 2004 आणि 2009 या निवडणुकांमध्ये सलग तीन वेळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. 2024 मध्ये त्यांनी लोकसभा लढण्याची तयारी करत अर्जही दाखल केला होता, मात्र ही जागा महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) ला देण्यात आल्याने त्यांनी पक्षशिस्त पाळत माघार घेतली.
India – Pakistan War : औरंगजेबाची अक्कल आत्ता आली ठिकाणावर !
तसेच, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनी तयारी केली होती. परंतु यावेळीही बुलढाणा जागा शिंदे गटाकडे गेल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला. पक्षनिष्ठा आणि शिस्तबद्धतेची दाखल घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.
Eknath Shinde Shivsena : शिवसेनेच्या पारंपरिक जागांवर शिंदे गटाचा दावा
विजयराज शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सातत्याने संघटनात्मक कामाला वाहून घेतले. जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे पक्षश्रेष्ठींचे मत असून, याच योगदानाची दखल घेत त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.