Six corporators, including the Deputy Mayor, join BJP : उपनगराध्यक्षासह सहा नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
Buldhana मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसला मोठा राजकीय झटका बसला असून, उपनगराध्यक्ष शेख सलीम चुनावाले यांच्यासह सहा नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकून थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. नागपूर येथे झालेल्या भाजपच्या विदर्भ कार्यशाळेदरम्यान या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष व आमदार विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी अधिकृत प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कैलास खर्चे, तस्लीम बाबा, संदीप वानखेडे, आसिफ कुरेशी, विजय सुरडकर यांचा समावेश आहे. हे सर्व नगरसेवक काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी होते.
Manikrao Kokate : कृषीमंत्री कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
या नगरसेवकांनी भाजपची कार्यपद्धती आणि जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांचे नेतृत्व प्रभावी वाटल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या घडामोडीमुळे मोताळा नगरपंचायतीत भाजपने प्रथमच आपला प्रभाव निर्माण केला असून, काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपने मोठी सेंध मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री करतील तीन हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासह आणखी काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे काँग्रेसची धावपळ सुरू झाली आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार रणधीर सावरकर, खासदार अनिल बोंडे, खासदार अनुप धोत्रे, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ. गणेश मांटे, चंद्रकांत बरदे, दत्ता पाटील, पुरुषोत्तम लखोटिया यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मोताळा नगरपंचायतीच्या राजकारणात हा मोठा भूकंप ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.








