Breaking

Buldhana Congress : तिरंगा यात्रेतून जवानांना सलाम, भाजपचा निषेध!

Tiranga Yatra to salute armed forces : काँग्रेसचा निर्धार, २१ मे रोजी बुलढाण्यात आयोजन

Buldhana माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी, २१ मे रोजी, जिल्हा काँग्रेसतर्फे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. त्याचवेळी भाजपच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानांचाही निषेध नोंदवण्यात येईल. या आयोजनाच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुलढाण्यात पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अध्यक्ष प्रकाश पाटील होते. आमदार धीरज लिंगाडे, श्याम उमाळकर, अॅड. साहेबराव मोरे, अॅड. बाबासाहेब भोंडे, हाजी दादू, हाजी रशिदखाँ जमादार आदी उपस्थित होते. बैठकीत भारतीय लष्कराच्या शौर्याचे कौतुक करत तिरंगा यात्रा भव्य व यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

Tiranga Yatra : मुनगंटीवारांच्या नेतृत्वात बल्लारपुरात दिसले ७ किलोमीटर लांब तिरंग्याचे विहंगम दृष्य !

युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच भाजपच्या एका मंत्र्याने लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या कथित जातीय टीकेवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. अॅड. विजय सावळे यांनी संबंधित मंत्र्याच्या हकालपट्टीचा ठराव मांडला, जो एकमताने मंजूर करण्यात आला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ही तिरंगा यात्रा केवळ लष्कराच्या सन्मानासाठी नसून, भाजपच्या फूटपट्टीच्या राजकारणाविरोधात एक प्रतीक म्हणून आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

बैठकीस सतीश मेहेंद्रे, सुनील सपकाळ, अविनाश उमरकर, नंदकिशोर बोरे, वसंतराव देशमुख, गणेश पाटील, हरीश रावळ, अॅड. अमर पाचपोर, मनोज वानखेडे, चित्रांगण खंडारे, तुळशीराम नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Damage to paddy and orchards : शेतकरी मेला तरी चालेल, पण रस्ते तेवढे झाले पाहिजे !

बैठकीदरम्यान माजी आमदार श्रद्धाताई टापरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन सतीश मेहेंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक रिंढे यांनी केले.