Breaking

Buldhana Dhad Grampanchayat : धाड ग्रामपंचायतमध्ये अनियमितता; माजी सरपंचांचा आरोप

Former sarpanch alleges financial irregularities in Gram Panchayat : न्यायालयात जाण्याची तयारी; दोघांच्या नावावर धनादेश वळवला

Buldhana तालुक्यातील धाड ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट संकेत माजी सरपंच रिजवान सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिले.

सौदागर यांनी स्फोटक आरोपांची मालिकाच उघड केली. त्यांनी सांगितले की, “दोन नागरिकांना कोणतीही माहिती न देता त्यांच्या नावावर ग्रामपंचायतीचे धनादेश काढून पैसे वळते करण्यात आले. या प्रकाराची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली असता दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली असता, मागवण्यात आलेल्या अहवालात संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे मान्य केले, मात्र भ्रष्टाचाराचा निषेध केला.”

Vidarbha Farmers : नियमित कर्ज भरले, प्रोत्साहन अनुदान कधी देणार?

तसेच, अतिक्रमण प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतरही ग्रामपंचायतीने काही अतिक्रमणे हटवली, काही मात्र जाणूनबुजून कायम ठेवली गेली, असा आरोप त्यांनी केला. “ग्रामपंचायत सदस्याच्या नातेवाइकाला टेंडर देता येत नाही, असे असताना टीका खान यांना टेंडर देण्यात आले, ही बाब संशयास्पद आहे,” असे सौदागर म्हणाले.

या परिषदेत आणखी गंभीर आरोप करताना ते म्हणाले की, “ग्रामपंचायतीने बांधलेली नाली रातोरात अज्ञात व्यक्तीने तोडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनी कोणतीही चौकशी केली नाही. पुन्हा तीच नाली बांधण्यात आली असून, या गैरव्यवहाराची माहिती जिल्हा परिषदेच्या सीईओंना देऊनही ते मूग गिळून गप्प बसले.”

Eknath Shinde Shiv Sena : निवडणुकांसाठी शिंदे सेना मैदानात; बुलढाण्यात मंथन

धाड ग्रामपंचायतीतील हे आरोप केवळ स्थानिक प्रशासनावरील प्रश्नचिन्ह नाही, तर वरपासून खालपर्यंतच्या दबावयंत्रणेचा वेध घेणारे ठरत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय राजकीय रंग घेण्याची शक्यता असून, विरोधकांकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होण्याची शक्यता आहे.