Drinking water, sanitation disorder at Buldhana District Hospital : सात दिवसांत समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा
Buldhana जिल्ह्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव जाणवत आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, MRI मशीन आणि स्वच्छता व्यवस्थेच्या अभावामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
निवेदनात मांडलेले गंभीर मुद्दे
स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव: रुग्णालयात पाण्याची कोणतीही सोय नसल्याने लोकांना पाणी विकत घ्यावे लागते किंवा अस्वच्छ पाणी पिण्याची वेळ येते. पाण्याच्या मशीन केवळ शोभेपुरत्या उभ्या आहेत.
Weather updates : सावधान… आजही जोरदार पावसाची शक्यता अलर्ट जारी!
MRI मशीन ठप्प: बराच काळ MRI मशीन कार्यरत नसल्याने रुग्णांना तात्काळ निदान मिळत नाही; परिणामी खासगी रुग्णालयांचा खर्च सहन करावा लागतो.
अस्वच्छतेचे साम्राज्य: रुग्णालय परिसरातील घाण ही संसर्गजन्य रोग प्रतिबंध अधिनियम, 1897 आणि राष्ट्रीय स्वच्छता मार्गदर्शक तत्वे यांचे उल्लंघन आहे.
ही परिस्थिती भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 (जीवनाचा व आरोग्याचा हक्क) तसेच सार्वजनिक आरोग्य नियमावलीचे सरळ उल्लंघन असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले की, “पुढील ७ दिवसांत समस्या सोडवा, अन्यथा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल.” या वेळी अमोल मोरे, महेंद्र जाधव, राहुल शेलार, शत्रुघ्न तुपकर, सुनील मिसाळ, शहनावाज आनवर, बबन बरडे, मोसीन खान, सागर भोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








