Breaking

Buldhana incident : उष्माघात नव्हे, मेंदूज्वर? सहावीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे शेगाव हादरलं!

 

Shegaon shaken by the death of a sixth-grade student : दोन दिवसांपूर्वी होता आजारी, ताप मेंदूमध्ये गेला

Khamgao संत गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगावमधून ११ एप्रिलला आलेली बातमी संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली. संस्कार सोनटक्के (वय ११) या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या उष्माघाताने मृत्यू झाल्याची चर्चा शेगावात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. मात्र, आरोग्य विभागाने मेंदूज्वरामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

संस्कार सोनटक्के हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठात इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. दोन दिवसांपूर्वी तो आजारी पडल्याने घरी परतला होता. प्रखर उन्हामुळे त्याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली होती. संस्कारला सुरुवातीला वांती आणि थकवा जाणवत होता, त्यामुळे त्याला शेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आणि शेवटी अकोला येथे नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Schools in rural areas : नवीन संचमान्यतेमुळे गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय

जिल्हा आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनुसार, संस्कार सोनटक्केला प्रारंभी व्हायरल इन्फेक्शन झाले होते, नंतर हा ताप मेंदूत गेला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक वैद्यकीय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मात्र खामगाव व शेगाव महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. शेगावसारख्या शहरात एप्रिल महिन्यातच ४१-४२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले जात आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जोखीम वाढली आहे.