Buldhana Police : सात दिवसांत हेल्मेट घ्या, अन्यथा…

Helmets will be mandatory in Buldhana within seven days:बुलढासात हेल्मेट सक्ती; आता नियमांची कठोर अंमलबजावणी

Buldhana जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत. आता हेल्मेट सक्ती मनावर घेण्यात आली आहे. सात दिवसांत कुठल्याही परिस्थितीत हेल्मेट घ्या, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच वाहनचालकांना देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात त्रिशरण चौकात झालेल्या दुर्दैवी अपघातात स्नेहल चौधरी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तत्काळ आवश्यक पावले उचलली. येत्या सात दिवसांत दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरेंचे आमदार-खासदार म्हणणार, ‘मी शपथ घेतो की’!

तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दाेन दिवसांत विशेष माेहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दि. १५ फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये आरोग्य, बांधकाम, वाहतूक, पोलिस आणि नगरपालिका विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखेने मागील दोन दिवसांत हेल्मेट, परवाना नसणे, ट्रिपल सीट आणि अतिरिक्त प्रवासी यासह विविध कारणांमुळे ७६८ प्रकरणांमध्ये ४.५ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.वाहतूक सुरक्षा आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भविष्यात अधिक कठोर उपाययोजना राबवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Blast at Asian Fireworks : बाजारगाव परिसरात दीड वर्षात २२ कामगार ठार!

प्रमुख निर्णय आणि उपाययोजना:

हेल्मेट सक्ती : पुढील ७ दिवसांत जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.
वाहन क्रमांक तपासणी : क्रमांक नसलेल्या टिप्पर आणि जड वाहनांवर कठोर कारवाईचे निर्देश.
अतिक्रमण हटवणे: शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर तत्काळ कारवाई.
वाहतूक नियमांचे पालन: ओव्हरलोड आणि ओव्हरस्पीड वाहनांवर कठोर कारवाई.
वाहन तपासणी मोहीम: वेळोवेळी जिल्हाभर तपासणी करून वाहतूक नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.
१०८ आपत्कालीन सेवा सक्षम करणे: अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी उपाययोजना.
ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम: मद्यधुंद वाहनचालकांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई.
एस.टी. आणि खासगी वाहतूक नियंत्रण: सार्वजनिक वाहतूक ठरावीक स्थानकांवरच थांबवण्याचे आदेश.