Villagers aggressive for demand of liquor ban : जिल्हा पाेलीस अधीक्षकांची घेतली भेट; संसार उध्वस्त होत असल्याची मांडली खंत
Buldhana घुस्सर बु. व घुस्सर खुर्द या दोन गावांमध्ये सुरु असलेल्या अवैध देशी व गावठी दारूबंदीची मागणी ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारा केली आहे. गावात हाेत असलेल्या अवैध दारु विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून युवक व्यसनाधीन झाले आहेत, अशी खंत त्यांनी पोलीस अधिक्षकांपुढे मांडली.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, या भागातील बहुतांश रहिवाशी शेतमजूर व गरीब आहेत. गेल्या काही दिवसांपासून या गावांमध्ये अवैध दारूचे प्रमाण वाढत आहे. किशोरवयातील मुले व वृद्धांपर्यंत त्याचा फैलाव झाला आहे. दारूचे व्यसन असलेल्या अनेकांनी घरातील अन्न, धन व वस्तू विकल्या आहेत, इतकेच नव्हे तर घरातील महिलांची मजुरीदेखील हिसकावून घेतली जाते, त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवले गेले आहे.
Sudhir Mungantiwar : 66 वर्षांच्या तुलनेत 11 वर्षांत 5 पट अर्थसंकल्पीय वाढ
दारूमुळे असंतुलन, कौटुंबिक हिंसा व असंतोष वाढला असून अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. काहींना असाध्य रोग जडले आहेत. तर काहींनी आत्महत्या केलेल्या घटना घडल्या आहेत. अनेक कुटुंब यामुळे उध्वस्त होत आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी म्हटले आहे की लग्नसमारंभ असो की सार्वजनिक कार्यक्रम — दारूडेंचे गोंधळ, असभ्य भाषेचा वापर, जीवेमारण्याच्या धमक्या या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे शांतता व एकोमभाव असलेल्या गावांचे वातावरण असंतुलित झाले आहे.
ग्रामस्थांनी या अवैध दारूबंदीसाठीत कारवाही करून जनतेचे जीवन सुरक्षित व सुखकर ठेवावे अशी मागणी केली आहे. जर आठ दिवसांपर्यंत कारवाही करण्यात आली नाही, तर पोलिस ठाण्यासमोर उपोषण केले जाईल, असाही इशारा दिला आहे.
Dangerous bridges : पुलांवर भरोसा ठेऊ नका, नदी-नाल्यांवर जाण्याचे टाळा !
निवेदनावर लता जाधव, रेणुका जाधव, ज्योती जाधव, शोभा जाधव, सिंधुबाई वानखेडे, आर. आर. तायडे, लता सुरडकर सहित असंख्य ग्रामस्थांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत.