Buldhana Politics : ‘३५ कोटी’वरून बुलढाण्यात राजकारण पेटले; गायकवाड-सपकाळ आमनेसामने

Sanjay gaikwad and harshwardhan sapkal word war : ‘फॉर्च्यूनर कोणाला?’ सपकाळांचा थेट सवाल; गायकवाडांच्या वक्तव्यावरून वाद चिघळला

Buldhana ‘३५ कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांना वाटले’ या वक्तव्यामुळे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाडांवर जोरदार हल्लाबोल करत वादाला अधिक धार दिली आहे. “३५ कोटींचे वाटप झाले, तर कोणत्या कार्यकर्त्याला फॉर्च्यूनर मिळाली? कोणत्या शेतकऱ्याला जमीन देऊन निराधारांना घरे दिली?” असे थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी गायकवाडांना खुलासा करण्याचे खुले आव्हान दिले आहे.

सपकाळ यांनी केवळ प्रश्नच उपस्थित केले नाहीत, तर राज्यातील परिस्थितीवर भाष्य करत “एका बाजूला भोंदूबाबांचा सुळसुळाट, तर दुसरीकडे भ्रष्टाचाराची विकृती” असे विधान करत सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

Ram Navmi celebration : रामनवमीच्या ६२ मिरवणुका, २३५० पोलिस तैनात

यापूर्वीही गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाकयुद्ध नवीन नसले, तरी ‘३५ कोटी’च्या मुद्द्यामुळे या वादाला वेगळेच परिमाण मिळाले आहे. दोघेही नेते आपल्या बेधडक आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जात असल्याने, हा वाद पुढे अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणतात, ‘अशोक खरात वयाने मोठे असल्यामुळे…’

राजकीय जाणकारांच्या मते, या प्रकरणामुळे केवळ वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपुरतेच मर्यादित न राहता, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. “अब बात निकली है तो दूर तलक जाएगी,” असे म्हणत सपकाळ यांनी या वादाची व्याप्ती वाढण्याचे संकेत दिले आहेत.एकूणच, ‘३५ कोटी’च्या एका वक्तव्याने बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, पुढील काही दिवसांत या वादाची दिशा आणि परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.