NCP-SHarad-Pawar-factor-held-meeting-acreoss-villeges : गावोगावी बैठका, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढल्या; शिंगणे यांच्या उपस्थितीने चर्चेला उधाण
Buldhana जिल्ह्यात काही महिन्यांपासून तुलनेने शांत भासणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आता पुन्हा ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये आल्याचे चित्र दिसू लागले आहे. गावोगावी बैठका, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि स्थानिक प्रश्नांवर वाढती आक्रमक भूमिका यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या हालचालींची चर्चा रंगू लागली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, हे केवळ सामाजिक कार्यक्रम नसून संघटनबांधणीच्या नव्या टप्प्याची सुरुवात आहे. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पक्ष आपली ताकद आजमावून पाहत असून, तळागाळात पुन्हा पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नांवर थेट भूमिका घेत “आम्ही अजून मैदानात आहोत” असा स्पष्ट संदेश देण्याची रणनीती आखली जात असल्याचे दिसते.
Prataprao Jadhav : प्रतापराव जाधवांचं चाललंय काय? महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह!
या उपक्रमांमध्ये माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची सक्रिय उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा आहे.
March End : ‘मार्च एंड’चा ताण वाढला; २४ कोटींच्या निधीसाठी आमदारांची धावपळ!
सध्या जिल्हा परिषद वगळता मोठ्या निवडणुका समोर नसल्या, तरी भविष्यातील राजकीय समीकरणांची पायाभरणी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचा हा ‘अॅक्टिव्ह मोड’ केवळ उपस्थिती वाढवण्यापुरता मर्यादित राहणार की व्यापक राजकीय पुनर्रचनेची नांदी ठरणार, याकडे आता बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








