Breaking

Buldhana Zilla Parishad : ग्रामपंचायतींच्या कारभारावर जिल्हा परिषदेचे लक्ष!

In-depth inspection of records in 870 Gram Panchayats : ८७० संस्थांमध्ये होणार कागदपत्रांची तपासणी; १८ जूनपासून मोहीम

Buldhana जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या कारभाराचा हिशेब आता जनतेसमोर येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी ८७० ग्रामपंचायतींच्या नोंदीची सखोल तपासणी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आहे. १८ जूनपासून ही मोहीम सुरु होत आहे. जिल्हा परिषद सभागृहामध्ये एक एक दस्तऐवज उघडला जाणार आहे.

विकासाच्या नावावर कुणी घोळ घालत असेल, तर त्याचा पर्दाफाश या माध्यमातून केला जाईल. उत्तरदायित्व व पारदर्शकता हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असावा, असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईचे स्वरूप अधिक कठोर असावे म्हणून एकावेळेस जवळपास १३० ग्रामपंचायतीचे दस्तऐवज तपासण्यात येणार आहेत.

Local Body Elections : जुने गण-गट कायम; नव्या आरक्षणावर सर्वांचे लक्ष

हरतालुकीला दोन विशेष विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून एक विस्तार अधिकारी १०-२० गावांतील नोंदी पडताळणार आहेत. ही चाचणी सुमारे एक महिना सुरु असणार असून शंभर टक्के दस्तऐवज तपासण्यात येतील. गटबाजी व स्थानिक दबावाचा प्रभाव टाळण्यासाठी अधिकाऱ्यांद्वारा क्रॉस-वेरिफिकेशन केले जाईल — अर्थात एखाद्या तालुक्यातील नोंदी दुसऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्याकडून तपासल्या जाणार आहेत. एकही नोंद शंकास्पद असू नये, असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावलं आहे.

Local Body Elections : गडचिरोली ते बुलढाणा… भाजपकडून निवडणुकीची जोमाने तयारी!

 

गुलाबराव खरात यांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व ग्रामसेवकांनी आपले दस्तऐवज अद्ययावत ठेवावे लागतील. ही कारवाई झाल्यानंतर कारभार अधिक पारदर्शक व जनहिताचा असावा, ही भूमिका असतानाच या निर्णयामुळे ग्रामसेवकांमध्ये असंतोषचे वातावरण असणे साहजिकच आहे. ग्रामविकासाचा कारभार अधिक शिस्तबद्ध व विश्वासास पात्र असण्यासाठी ही कारवाई महत्वपूर्ण असेंल, असं जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे.