Karuna Sharma claims Dhananjay Mundes three flats in Mumbai :धनंजय मुंडेंचे मुंबईत तीन फ्लॅट करुणा शर्मांचा दावा
Mumbai ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मुंबईत आलिशान घरे असूनही ते अजूनही सरकारी निवासस्थान ‘सातपुडा’मध्ये राहत असल्याचा आरोप त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी दावा केला की मुंडेंच्या नावावर मुंबईत तब्बल तीन फ्लॅट असून, त्यात मलबार हिल, पवई आणि सांताक्रुज येथील घरे समाविष्ट आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंडेंनी माध्यमांना सांगितले होते की, “मुंबईत माझे स्वतःचे घर नाही, त्यामुळे मी सरकारी निवासस्थानात राहतो”. मात्र करुणा शर्मा यांनी हा दावा फेटाळत सांगितले की, मुंडेंच्या प्रतिज्ञापत्रातच मालाबार हिलवरील फ्लॅटचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे पवईतदेखील त्यांचा एक फ्लॅट असून, सांताक्रुजमधील फ्लॅटमध्ये सध्या त्या स्वतः राहतात.
Jaya Vs Kangana : अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहात, लाज बाळगा !
करुणा शर्मा यांनी थेट आव्हान देत म्हटले “सांताक्रुजच्या घरी तुम्ही दुसऱ्या पत्नीसमवेत राहायला या. मी भाड्याने दुसरीकडे राहीन. पण सरकारी बंगला तात्काळ सोडा. तुमची आमदारकी जाणार आहे, मंत्रीपदाचे स्वप्न पाहू नका.” त्यांनी पुढे टोला लगावत सांगितले “तुम्ही मला दिलेला फ्लॅटही तुमचाच आहे, म्हणजे माझा फ्लॅटदेखील तुमचाच झाला. त्यामुळे सरकारी निवासस्थानावर डोळा ठेवण्याची गरज नाही.”
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या ‘किचन ३६५’ भेटीवर युवक काँग्रेसचा संताप!
कृषीमंत्रीपद गेल्यानंतर पाच महिने उलटून गेले तरी मुंडे अजूनही ‘सातपुडा’ निवासस्थान रिकामे केलेले नाहीत. याआधी त्यांनी “माझी प्रकृती ठीक नाही आणि मुलीच्या शिक्षणासाठी येथे राहतो” असे कारण दिले होते. मात्र करुणा शर्मा यांनी प्रतिज्ञापत्रातील घरांचा उल्लेख करून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. या आरोपांमुळे धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आले असून, सरकारी निवासस्थानाचा गैरवापर झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
___