Bunty Shelke’s movement is not supported by Congress leaders of Nagpur : नेतृत्वाचा डोक्यावर हात; पण स्थानिक नेत्यांचं दुर्लक्ष
Nagpur विधानसभा निवडणूकीनंतर थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवरच बंटी शेळके यांनी आरोप केले होते. त्यानंतर शेळके यांच्यावर कारवाई होईल, असे वाटले होते. मात्र नाना पटोलेंनी राजीनामा दिला नाही आणि बंटी शेळके यांच्यावरही कारवाई झाली नाही. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले बंटी शेळके मात्र पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. त्यांनी सोमवारी (दि. ६ जानेवारी) नागपूर सुधार प्रन्यासवर NIT मोर्चा काढला. पण मोर्चामध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची अनुपस्थितीच जास्त चर्चेत राहिली.
बंटी शेळके यांनी विविध मागण्यांसाठी नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयावर मोर्चा तर काढला. मात्र या मोर्चाला कॉंग्रेसच्या शहर कार्यकारिणीतील मोठ्या पदाधिकारी व नेत्यांनीदेखील दांडी मारल्याचे दिसून आले. त्यामुळे शेळके यांचे पुढील पाच वर्षे ‘एकला चलो रे’ असेच धोरण राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. गुंठेवारी कायद्यांतर्गत भूखंड नियमित करण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात कपात करा, खेळाच्या मैदानांचा योग्य वापर करा यांसह विविध मागण्यासांठी हा मोर्चा होता.
Local Body Elections : निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच बाशिंग बांधून तयार !
या मोर्चाबाबत अगोदरपासूनच वातावरण निर्मितीचा शेळके यांनी प्रयत्न केला होता. मात्र त्यांचे कार्यकर्ते सोडले तर काँग्रेसचे शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनीदेखील या मोर्चाकडे पाठ फिरवली. शेळके यांच्यासोबत गेलो तर वरिष्ठ नाराज होतील, हाच विचार सर्वांनी केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बंटी शेळके यांनी मध्य नागपुरात भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या मतदारसंघात हलबा समाजाने वेगळी चूल मांडली. त्यामुळे भाजपसाठी डोकेदुखी होती. पण या संपूर्ण परिस्थितीत काँग्रेसचे युवा उमेदवार बंटी शेळके यांनी दमदार कामगिरी केली. २०१९ च्या निवडणुकीतही बंटी शेळके यांनी ७० हजाराच्या वर मते घेतली होती. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार, हे निश्चित होते. विशेष म्हणजे ते निवडणूक हरले असले तरीही त्यांना २०१९च्या तुलनेत जास्त मते मिळाली.
Fake appointment letters Scam : नोकरीच्या नावावर लुबाडणाऱ्या टोळ्या सक्रीय
दरम्यान, निवडणूक आटोपताच बंटी यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर शरसंधान साधले. ‘नाना पटोले यांनी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला साथ दिली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत कामासाठी उतरवले नाही,’ असे आरोप बंटी यांनी केले होते. या आरोपांची चर्चा दिल्लीपर्यंत गेली. कारण बंटी शेळके यांच्या डोक्यावर राहुल गांधी यांचा हात असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच बंटी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी महालात रोड शो केला होता. असे असूनही बंटी शेळकेंच्या सोमवारच्या (६ जानेवारी) मोर्चात काँग्रेसचा एकही मोठा नेता उपस्थित नव्हता, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.








