burglaries found, valuables worth 15.88 lakhs seized : पोलिसांनी शिताफीने केली अटक; गुन्हे शाखेची कारवाई
Wardha जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यात सतत वाढत असलेल्या घरफोडी, दुकानफोडी, तसेच चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी अट्टल घरफोड्या करणाऱ्या दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख ८८ हजार ३९१ रुपयांचा मुद्देमाल ‘रिकव्हर’ करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली.
सुनिल उर्फ रॉकी शांताराम शिंदे (२३), चंदू उर्फ चंद्रकांत हिरा बतकल (३६) दोन्ही रा. बोरगाव मेघे गिट्टीखदान अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यात घरफोडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक चोरट्यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. शहरात सराईत गुन्हेगारांची तपासणी करत असताना दोन्ही सराईत चोरट्यांना ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली.
Murder attempt in Nagpur : मला एक आवाज येतोय… कुटुंबाला संपवून टाक!
दोन्ही चोरट्यांनी त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या कारचा वापर केला. इतर साथीदारांसह मिळून सेवाग्राम हद्दीतील १ घरफोडी व किराणा दुकान, खरांगणा हद्दीतील आंजी मोठी येथील किराणा दुकान फोडले. देवळी येथील गौळ गावातील खराबे महाराज देवस्थानात चोरी, पुलगाव येथील घरफोडी, हिंगणघाट हद्दीत १ दुकान व १ घरफोडी, हिंगणघाट येथील रेल्वे हद्दीतील वॅगन फोडून तांब्याची चोरी केली. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील घरफोडी, राळेगाव येथील दुकान फोडून तांबा चोरी आदी विविध ठिकाणी घरफोडी, दुकान फोडी व मंदिर चोरीचे एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली.
Akola Police in Action हातरुण येथे दोन गटांत राडा; सहा जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक !
चोरलेल्या मुद्देमालासंबंधाने आरोपींची विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्यातील पिवळ्या धातूचे मंगळसूत्र, बांगड्या, कानातील बिऱ्या, गळ्यातील चेन, अंगठी, असे पिवळ्या धातूचे १४६ ग्राम वजनाचे दागिने, चांदीचे शिक्के, पैजण ६८ ग्राम वजनाचे दागिने, पांढऱ्या मण्यांची माळ, ३,९८,००० रुपये रोख, ६ पेन ड्राइव्ह, विविध कंपनीचे ३५ सिगारेट पाकीट, बिडी बंडल, तेलाचे कॅन, तुपाचे डब्बे, तसेच २ मोबाइल फोन, घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पेचकस, असा एकूण १५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.