A running passenger vehicle caught fire : जीवितहानी टळली; धानोराजवळील घटनेने भीतीचे वातावरण
Gadchiroli धानाेरा-मुरुमगाव मार्गावर सालेभट्टी गावाजवळ मंगळवारी, दि. ४ मार्चला दुपारी दोनच्या सुमारास धावत्या चारचाकी प्रवाशी वाहनाने पेट घेतला. वाहनात बसलेले तिघेही वाहनातून उतरल्याने सुदैवाने काेणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहन जळून खाक झाले.
जळालेले वाहन धानाेरा येथील राजकुमार वाघमारे यांच्या मालकीचे आहे. ते स्वत:च वाहन चालवत हाेते. ते धानाेरावरून मुरुमगावकडे जाण्यासाठी निघाले हाेते. वाहनात इतर दाेन साेबती बसले हाेते. वाहन सालेभट्टी गावाजवळ पाेहाेचताच वाहनाने पेट घेण्यास सुरुवात केली. ही बाब वाघमारे व इतर तिघांच्या लक्षात येताच, तिघेही वाहनातून खाली उतरले. त्यामुळे काेणतीही जीवितहानी झाली नाही.
वाहनाला आग लागल्याची माहिती धानाेरा नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन वाहन तत्काळ घटनास्थळी पाेहाेचले. मात्र, ताेपर्यंत वाहन जळून खाक झाले हाेते. वाघमारे यांनी नुकतेच दुसऱ्याकडून वाहन खरेदी केेले हाेते. वाहन जळाल्याने वाघमारे यांचे माेठे नुकसान झाले आहे. वाहन जळतानाचा व्हिडीओ अनेकांनी कॅमेराबद्ध केला. हा व्हिडीओ जिल्हाभरात साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे.
राजकुमार वाघमारे यांचे वाहन जुने आहे. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच, वाहनात बसलेले सर्वच जण उतरल्याने जीवितहानी टळली.