C. P. Radhakrishnan said that our students should learn at least one world language : पारंपारिक कौशल्याच्या पुढे जाऊन नावीन्याची कास धरा
Mumbai : परदेशी भाषा शिक्षणाचे महत्व वाढत आहे. अशात राज्याच्या कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विभागाने जर्मन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मन भाषा शिकवून मनुष्यबळ पुरवण्याचा निर्णय योग आहे. विकसीत राष्ट्र निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला स्किल इंडिया हा उपक्रम महत्वाचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एक तरी जागतिक भाषा शिकली पाहिजे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौश्ल्य विद्यापीठाचा दुसरा वर्धापन दिवस नुकताच पार पडला. याच्या समारोपीय कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. ते म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात मनुष्यबळाची कमतरता नाही. जगातील इतर देशांमध्ये आपण ते पुरवू शकतो. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारतीय मूल्ये आणि एकात्मिक शैक्षणिक प्रणालीवर भर दिला जात आहे. कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर दिल्यास जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. त्या दिशेने काम झाले पाहिजे.
Governor C P Radhakrishnan : विद्यापीठ, प्राध्यापकांनी आता बदल स्वीकारावे
आर्टिफिसियल इंटेलिजन्स AI, सेवा क्षेत्र, औद्योगिक व्यवस्थापन रिअल इस्टेट या क्षेत्रात रतन महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षण देत आहे. यातून जगभरात मुनष्यबळ पुरवले जात आहे. ही आपल्यासाठी सकारात्मक बाजू आहे. आपल्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यात पारंगत करणे, ही काळाची गरज आहे. नवी पिढी घडवण्यासाठी पारंपारिक कौशल्याच्या पुढे जाऊन नावीन्याची कास धरली पाहिजे. यासाठी आपल्या शिक्षकांनी नव्या संकल्पना समजून घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.
Governor C.P. Radhakrishnan : शेतकऱ्यांचे कल्याण करणाऱ्या संशोधनाची गरज!
रतन विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिवस कार्यक्रमात कौशलय् रोजगार उद्योजकता व नानिन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, या विभागाच्या अप्पर मुख्य सचित मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी.जी. सिताराम, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिश७ संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, कौशल्य विभाग आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते.
Budget Session 2025 : सभापती व अध्यक्षांकडून कामकाजात पक्षपात !
विद्यापीठाच्या वर्धापन दीन समारोपात कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सिताराम, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, कौशल्य विभाग आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते.