Shinde groups minister also opposed the decision regarding Hindi : शिक्षण मंत्री त्यांचाच, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत दर्शवला विरोध
Mumbai : राज्यात सध्या त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी आणि हिंदीचा पर्याय यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यांना इतर पक्षांचाही पाठिंबा मिळत आहे. सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवारांनीही तशीच भूमिका मांडली आहे, दरम्यान, सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना पण हा निर्णय रुचलेला नाही. शालेय शिक्षण मंत्री त्यांच्याच गटाचा असतानाही, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काहींनी याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हिंदी भाषेबाबतचा मुद्दा चर्चेत आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिंदी भाषेबाबतच्या सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला अशी माहिती समोर येत आहे. हिंदी भाषेला शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांचा विरोध होत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं. मात्र, हिंदी भाषा लादण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. या संदर्भात सरकार आता एक समिती स्थापन करत हा वाद तूर्त शमवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगें पुन्हा मैदानात, 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार
सरकारने त्रिभाषा शिक्षणाचं स्वरुप स्वीकारल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. दोघांनी पण या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. शिवाय मराठी भाषेसाठी दोघेही मैदानात उतरले आहेत. या निर्णया विरोधात ते मोर्चा देखील काढत आहेत. कोणत्याही पक्षाचा हा मोर्चा नसून यात सगळ्यांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे त्यांना इतर पक्षांचाही चांगला पाठिंबा मिळत आहे हे पाहून शिंदे गटातला पण काहीही भीती वाटत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात त्रिभाषा सूत्र अंतर्गत इंग्रजी मराठी सोबत तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा अन्य भाषेचा पर्याय निवडावा, यासाठी भाजप आग्रही आहे. नव्या शैक्षणिक धोरणाचा दाखला देत भाजप, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या संदर्भातील अहवाल स्वीकारण्यात आला होता हे वारंवार समजावून सांगत आहेत सोबतच या कोवळ्या वयात भाषा शिकवणे किती गरजेचे आहे? हे ते पटवून देत आहेत. त्यांच्या निर्णयात कायम सोबत असलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना, ही आधी यावर जास्त भाष्य करत नव्हती. कारण शालेय शिक्षण मंत्रीपद त्यांच्याच गटाकडे आह. पण त्यांचेही मंत्री आता यावर आक्षेप नोंदवू लागले आहेत.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय फाडला, राज्यभर आंदोलन निर्णयाची होळी !
हिंदी भाषेबाबतच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच भाजपचे सगळे मंत्री प्रवक्ते हा निर्णय कसा गरजेचा आहे ते पटवून देत आहेत. दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिंदी विरोध करत आहात, तसाच इंग्रजीलाही विरोध करा असा सल्ला विरोधकांना दिला आहे, त्यामुळे सरकारमध्ये भाजप हिंदी भाषेसाठी आग्रही असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या निर्णयाला काहीसा विरोध करताना दिसत आहेत.