Breaking

cabinet reshuffle : वादग्रस्त वक्तव्य टाळून कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद !

Indications of cabinet reshuffle Eknath Shindes warning to ministers : मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; एकनाथ शिंदेंची मंत्र्यांना तंबी

Mumbai : राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत कामगिरीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद वाढवावा, माध्यमांत बोलण्याऐवजी कामातून उत्तर द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

अलीकडेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. विधिमंडळात रमी खेळल्याच्या घटनेनंतर ते वादाच्या भोवऱ्यात आले होते. यानंतरच एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याची आणि कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद दिली.

Kisan Congress : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर याद राखा, किसान काँग्रेसचा सरकारला इशारा

विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्याऐवजी जनतेतून आणि कामातून उत्तर द्यावे, असे सांगत शिंदेंनी मंत्र्यांना अडीच वर्षांचा कालावधी लक्षात ठेवण्यास सांगितले. दिलेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीचा अपेक्षित निकाल मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही मंत्र्यांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. काही मंत्र्यांच्या वागणुकीवरून तक्रारी वाढल्याने मंत्रिमंडळातील शिस्तीबाबत गंभीरता दाखवली आहे.

Uddhav Balasaheb Thackarey : मेंढळी रस्त्यावरचा पूल दुरुस्त करा, नाहीतर आमरण उपोषण करू

एकनाथ शिंदेंचा सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली दौरा चर्चेत आला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन जवळपास 25 मिनिटे एकांतात चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. एकनाथ शिंदेंनी यावेळी मोदींना भगवान शंकराची प्रतिमा भेट दिली.