Candidates car accident : शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारची भरधाव धडक

Four people died due to a heart attack suffered by the driver : ड्रायव्हरला आलेल्या हार्टअटॅकमुळे चार जणांचा मृत्यू

Thane : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे यांच्या कारने भरधाव वेगात समोरून येणाऱ्या अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्दैवी घटनेचे कारण ड्रायव्हरला अचानक आलेला हार्टअटॅक असल्याची माहिती समोर आली आहे.

चौबे यांच्या कारचे चालक लक्ष्मण शिंदे हे वाहन चालवत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणाचाही विलंब न होता वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित कारने पुलावरून जाणाऱ्या बाईकस्वार व काही पादचारी नागरिकांना चिरडत पुढे अनेक मीटर अंतरापर्यंत धडकांचा सिलसिला सुरूच ठेवला.

Maratha Reservation : मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाचा सरकारचा निर्णय अयोग्य, मुंबई उच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद !

या अपघातात चालक लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एका पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला. उमेदवार किरण चौबे देखील जखमी झाले असून त्यांना तातडीने कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून कळते. अपघातानंतर काही मिनिटांतच परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आणि रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली.

या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेजमध्ये कारचा प्रचंड वेग, अचानक झालेले विचलन आणि बाईकस्वारांना झालेली भीषण धडक स्पष्ट दिसत आहे. धडकेची तीव्रता इतकी जास्त होती की दुचाकी आणि त्यावरील स्वार लांब अंतरावर फेकले गेले. अनेक दुचाकींचे मोडतोड होऊन मोठे नुकसान झाले आहे.

Local Body Elections : कामठी–मौद्यात ‘महा-ट्युनिंग’चा खेळ ! बावनकुळे आणि अजित पवारांची जुळवाजुळव चर्चेत !

घटनेनंतर अंबरनाथ पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले. अपघाताच्या वेळी कार अत्यंत भरधाव असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका जाहीर झालेल्या पार्श्वभूमीवर उमेदवार किरण चौबे हे बुवापाडा परिसरातील संघटनेच्या सभेसाठी जात असताना हा अपघात झाला आणि त्यामुळे ही घटना आणखी चर्चेचा विषय ठरली आहे.

अचानक आलेला हार्टअटॅक, भरधाव वेग आणि पुलावरील रहदारीच्या परिस्थितीने एकत्र येऊन झालेल्या या अपघाताने अंबरनाथ शहराला मोठा धक्का दिला असून मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

_______