BJP attacks Congress over illegal birth certificates : “राष्ट्रविरोधी कृत्य करणाऱ्यांना एवढा पुळका का?”, भाजपचा सवाल
Amravati राज्यातील बेकायदेशीर आणि अवैधरित्या बनावट जन्मदाखले मिळविणाऱ्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणी काँग्रेसचे नेते अशा बेकायदेशीर जन्मदाखले मिळविणाऱ्यांना साथ देत असल्याचा आरोप भाजपने गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. “राष्ट्रविरोधी कृत्य करणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस का उभी राहते? त्यांना एवढा पुळका का येतो?” असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
काँग्रेसचे प्रत्युत्तर
किरीट सोमय्या यांनी अमरावतीत बेकायदेशीर जन्मदाखले मिळवून बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांतून जन्मदाखल्यांची तपासणी करण्यात आली. यात एकही बांगलादेशी किंवा पाकिस्तानी नागरिक आढळून आला नाही. त्यामुळे अमरावतीला बदनाम करणे आणि एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणे, हेच सोमय्यांचे उद्दिष्ट असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केला होता.
Education Department : विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवली, मग शिक्षकांची नियुक्ती झाली
भाजपचा पलटवार
काँग्रेसच्या या आरोपानंतर भाजपने पत्रकार परिषद घेतली. “एका समुदायाचे एकगठ्ठा मत मिळविण्यासाठी लांगूलचालन करणे ही काँग्रेसची जुनी सवय आहे. त्यांचे खरे रूप उघड झाल्याने मतदारांनी त्यांना पराभूत केले. हा पराभव काँग्रेस नेत्यांना पचवता येत नाही,” असा आरोप भाजपने केला.
Jayashri Shelke : सणासुदीच्या काळात रेशनकार्डधारकांना गहू वाटप करा
“बेकायदेशीर जन्मदाखले प्रकरण असो, स्व. उमेश कोल्हे हत्या प्रकरण असो किंवा रझा अकादमीच्या हिंसाचाराचा प्रश्न असो – काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सतत त्या विशिष्ट समुदायाचीच पाठराखण केली. त्यामुळे जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याची नाचक्की झाली आहे,” असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेस भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, राधा कुरील, चेतन पवार, राजू कुरील आणि बादल कुलकर्णी उपस्थित होते.