Export Promotion Scheme Helped startup : सरकारच्या निर्यात केंद्राचा लाभ; पोस्टाच्या माध्यमातून योजना
Akola कोणताही उद्योग, व्यवसाय सुरू केल्यानंतर सर्वप्रथम मार्केटिंगचा प्रश्न पुढे उभा राहतो. विशेषतः छोट्या उद्योगांना बाजारपेठ मिळवताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने छोट्या उद्योगांना निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देत पोस्टाच्या माध्यमातून निर्यात केंद्र सुरू केले आहे. त्या माध्यमातून छोटे उद्योजक आता थेट अमेरिकेसह जगभरातील 198 देशांमध्ये पोहोचत आहेत. अकोल्यातून पहिले निर्यात पार्सल पोस्टाच्या मध्यामातून मंगळवारी पाठवण्यात आले.
छोट्या उद्योगांच्या निर्यातवाढीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. अकोला डाकघर निर्यात केंद्रातून अमेरिकेला पहिले पार्सल रवाना करण्यात आले. छोट्या उद्योग व व्यावसायिकांना आपल्या वस्तू परदेशात निर्यात करण्यासाठी अकोला येथे डाकघर निर्यात केंद्राची सुविधा सुरू करण्यात आली आहे. येथील एका व्यावसायिकाला व्यापार संकेतस्थळावर मिळालेल्या ऑर्डरनुसार या केंद्रातून भांड्यांचे पहिले पार्सल अमेरिकेला रवाना करण्यात आले. छोट्या व किरकोळ व्यावसायिक-उद्योजकांसाठी हे केंद्र निर्यातीसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे.
CM Devendra Fadnavis, Nagpur Police : लहान भावापुढेच मोठ्या भावाचा निर्घृण खून!
एजंटची आवश्यकता नाही
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योजकांसाठी निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा जुन्या सुती बाजारातील पंचशील इमारतीत झाली. त्यावेळी टपाल कार्यालयाचे विपणन अधिकारी गजानन राऊत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, परदेशी व्यापार व निर्यातीसाठी मुंबई येथे जाऊन एजंट नेमण्याची गरज नाही. छोट्या व किरकोळ व्यावसायिकांना मिळालेल्या ऑनलाईन ऑर्डरनुसार आपल्या वस्तू जगातील अनेक देशात पाठवता येणार आहे. वस्तू त्या त्या देशातील ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत मागोवा घेतला जातो व ट्रॅकिंगचे अपडेटस् निर्यातदाराला मिळत राहतात.
Nagpur Municipal Corporation : नागपुरात होणार स्वच्छता सर्वेक्षण!
निर्यातीला प्रोत्साहन व रोजगार निर्मिती
निर्यातीला प्रोत्साहन देणे व रोजगारनिर्मितीचे लक्ष्य साध्य करणे हा कार्यशाळेचा हेतू असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी सांगितले. या कार्यशाळेत उद्योग विभागाचे साकेत पांडे, सनदी लेखापाल नवीन कृपलानी, सल्लागार अंकित गुप्ता, आकाश शहा, लघुउद्योग सल्लागार प्रीतम लोणकर, वस्तू व सेवा कर विभागाचे प्रवीण भोपळे यांनी मार्गदर्शन केले








