Breaking

Central Sector Scholarship Scheme – CSSS : १२ वर्षांत एक पैसाही वाढ नाही; केंद्र सरकारला शिष्यवृत्ती दरवाढीचा विसर

Not a single penny increased in 12 years in scholarship scheme : खासदारांचे केंद्राला पत्र; ६५ टक्के दरवाढ अपेक्षित, पण अद्याप निर्णय नाही

Amravati मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत दिली जाणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना मागील १२ वर्षांपासून दरवाढीपासून वंचित आहे. नियमानुसार दर पाच वर्षांनी शिष्यवृत्तीच्या रकमेत ६० ते ६५ टक्के वाढ करणे अपेक्षित असते. मात्र, २०१० नंतर आजवर एकदाही वाढ करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे MP Balwant Wankhede यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह संबंधित सचिवांना पत्राद्वारे पाठवून शिष्यवृत्ती दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.

मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी नुकतेच शिष्यवृत्ती वाढीसंदर्भात खासदार वानखडे यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यानंतर खासदारांनी मंत्रालयाशी अधिकृत पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप केंद्र सरकारने यावर कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.

Praveen Gaikwad : संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं

कोणाला मिळते ही शिष्यवृत्ती?

भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC), तसेच विशेष मागास गट (NT, DNT) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही शिष्यवृत्ती ११वीपासून पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांपर्यंत लागू होते. योजनेत ४ गटांप्रमाणे दर निश्चित आहेत.

Ajit Pawar: ‘ नेमका कुठला निधी मिळाला नाही मी त्याला विचारतो,’

ग्रुप-३ मधील विद्यार्थ्यांना २००४ पर्यंत दरमहा १८५० रुपये शिष्यवृत्ती मिळत होती. २०१० मध्ये ती रक्कम वाढवून ३ हजार रुपये करण्यात आली. त्यानंतर गेल्या १५ वर्षांत या रकमेत एक पैसाही वाढ करण्यात आलेली नाही.