Students should be given another chance through the ‘Carry On’ scheme : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Mumbai : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजना” लागू करायचा आहे. त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी द्यावी, यासाठी विद्यापींठाच्या पातळीवर एक समानता ठेवावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
आज (५ फेब्रुवारी) मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीलासर्व विद्यापींठाचे कुलगुरू, कुलसचिव (ऑनलाइन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच राज्यभरातील विविध अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Chhagan Bhujabal : महाराष्ट्र शासनालाही नाशीक कुंभमेळ्यासाठी मिळवता येतील ७,५०० कोटी !
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, काही वेळा शैक्षणिक कारणांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येतात. त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी कॅरी ऑन योजनेचा उपयोग होतो. मात्र याबाबत सर्व विद्यापींठाच्या पातळीवर एकसमानता असली पाहिजे. यासाठी कालबद्ध नियोजन करावे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचा वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कॅरी ऑन योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या वर्षासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात यावी, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
Governor C.P. Radhakrishnan : शेतकऱ्यांचे कल्याण करणाऱ्या संशोधनाची गरज!