A modern blood bank will be established in Chandrapur by ‘Samvad’ : लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांसाठीही ठरणार आशेचा किरण
Chandrapur : रक्ताच्या तुटवड्यामुळे बहुतेकदा गंभीर रुग्णांना प्राण गमवावे लागतात. उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा अधिक जाणवतो. असे होऊ नये, यासाठी आता चंद्रपूरमध्ये विदर्भातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक रक्तपेढी उभारण्यात येणार आहे. संवाद प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
येत्या रविवारी, २७ एप्रिलला सकाळी ११ वाजता रक्तपेढीच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. चंद्रपूर – नागपूर मार्गावरील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मागील परिसरात विदर्भातील सर्वात मोठी रक्तपेढी उभारली जाणार आहे. या रक्तपेढीला श्रीमती चंद्रभागाबाई नामदेव पाटील वासाडे, असे नाव देण्यात आल्याची माहिती संवाद प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे.
Chandrapur Politics : निधी आणल्याचा दावाच नाही, तर मग श्रेय कशाला घेता ?
ही रक्तपेढी अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणार आहे. रक्त आणि रक्त उत्पादने येथे गोळा केली जातील. रक्ताची तपासणी करण्यासोबतच साठवणूकही केली जाणार आहे. रक्तदान करण्यांकडून घेतलेल्या रक्तातील लाल पेशी, प्लाज्मा, प्लेटलेट्स हे घटक वेगळे करण्याचीही सुविधा असणार आहे. आवश्यतेनुसार रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांसाठी ही रक्तपेढी आशेचा किरण ठरणार असल्याचे संवाद प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् मूल बसस्थानकावर उपलब्ध झाले शुद्ध, थंड पाणी !
औद्योगिक विस्तार होत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात रहदारी दिवसागणिक वाढत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघाताच्या घटना होत असतात. यांतील गंभीर जखमी रुग्णांनी रक्ताची गरज भासते. अशा वेळी रूग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. वेळेवर रक्त न मिळाल्यास रुग्णांची जीवही जातो. यापुढे असे होऊ नये, म्हणून संवाद प्रतिष्ठान पुढाकार घेऊन ही रक्तपेढी स्थापन करणार आहे.