Chandrapur Municipal Corporation : अंतर्गत कलहाने काँग्रेसची ‘हात’ची सत्ता गेली; वडेट्टीवार-धानोरकर वादाचा भाजपला फायदा

congress-loss-chandrapur-mayor-poll-internal-rift-vaddetiwar-dhanorkar : सर्वाधिक जागा असूनही काँग्रेस पराभूत; गटबाजीचा फटका आणि समन्वयाचा अभाव

Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक असतानाही केवळ अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांमधील अहंकाराच्या लढाईमुळे काँग्रेसला महापौरपदाची खुर्ची गमवावी लागली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील टोकाच्या वादाने काँग्रेसच्या विजयाची संधी हिरावून घेतली. हा पराभव काँग्रेससाठी स्थानिक पातळीवर मोठा धक्का मानला जात आहे.

महापौरपदावरून वडेट्टीवार आणि धानोरकर समर्थकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू होते. धानोरकर यांनी १३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याने पक्षातील दुफळी जाहीर झाली होती. हा वाद मिटवण्यासाठी हायकमांडने हस्तक्षेप करूनही स्थानिक पातळीवर एकवाक्यता होऊ शकली नाही. याचाच परिणाम असा झाला की, निवडणुकीच्या वेळी हक्काची मते फुटली किंवा तटस्थ राहिली.

Chandrapur Mayor Election : मुनगंटीवारांची रणनीती ठरली कमाल,संगीता खांडेकरांच्या गळ्यात पडेल महापौरपदाची माळ

काँग्रेसने आपल्या हक्काच्या सहकारी पक्षांना, विशेषतः शिवसेना (उबाठा) गटाला सोबत ठेवण्यात कुचराई केली. उबाठा गट महापौरपदासाठी आग्रही असताना काँग्रेसने लवचिकता दाखवली नाही. याउलट भाजपने दिलेल्या प्रस्तावामुळे उबाठा गट तिकडे वळला. सर्वाधिक जागा असूनही केवळ रणनीतीच्या अभावामुळे काँग्रेसला आज सत्तेबाहेर राहावे लागले आहे.

Maharashtra politics : देवेंद्र फडणवीसांचा रात्रीचा गुप्त दिल्ली दौरा, पहाटे मुंबईत परतले!

मुनगंटीवार ठरले ‘किंगमेकर’
माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले. काँग्रेसमधील अंतर्गत कलह (वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर) ध्यानात घेऊन मुनगंटीवारी रणनिती आखली. अशक्य वाटणारे समीकरण जुळवून मुनगंटीवारांनी भाजपच्या बाजुने महापौरपद वळवले. त्यामुळे ‘किंगमेकर’ म्हणून त्यांचे स्थान पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.