Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत मुनगंटीवारांची गरुड झेप; फडणवीसांनी दिलेली जबाबदारी सार्थकी

sudhir-mungantiwar-success-chandrapur-municipal-corporation-mayor-election-bjp-victory : भाजपाच्या संगीता खांडेकर महापौर; उबाठा गटाला विश्वासात घेण्यात मुनगंटीवार यशस्वी

Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित पण नियोजित विजय मिळवत पुन्हा एकदा मनपावर आपला झेंडा फडकावला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आखलेली राजकीय रणनीती कमालीची यशस्वी ठरली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर सोपवलेली ही प्रतिष्ठेची जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली आहे. त्यांच्या चाणक्यनितीमुळे भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या नव्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत.

विरोधी गटाकडे संख्याबळ जास्त असतानाही सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत शांतपणे ‘फिल्डिंग’ लावली. या विजयाचे सर्वात मोठे श्रेय मुनगंटीवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सोबत घेण्यात मिळवलेल्या यशाला दिले जात आहे. त्यांनी सव्वा वर्षासाठी भाजप आणि उर्वरित काळासाठी उद्धव सेना, असा सत्तेचा समतोल राखणारा प्रस्ताव दिला. मुनगंटीवारांच्या या प्रस्तावामुळे उद्धव सेनेचा पाठिंबा भाजपला मिळाला आणि विजयाचे गणित सुटले.

Chandrapur Mayor Election : मुनगंटीवारांची रणनीती ठरली कमाल,संगीता खांडेकरांच्या गळ्यात पडेल महापौरपदाची माळ

वंचित आणि एमआयएमची ‘छुप्या’ मदतीची खेळी
मुनगंटीवारांच्या रणनीतीने इतर छोट्या पक्षांच्या हालचालींवरही नियंत्रण मिळवले. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांची अनुपस्थिती आणि एमआयएमची तटस्थ भूमिका यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. या विजयाने विदर्भाच्या राजकारणात मुनगंटीवार यांचे स्थान आणि ‘किंगमेकर’ म्हणून असलेली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मुनगंटीवारांनी लिलया पेलली जबाबदारी
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपविल्याने मुनगंटीवारांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर या ‘अशक्य’ वाटणाऱ्या मोहिमेचे रूपांतर विजयात केले. केवळ भाजपचा विचार न करता, ‘उबाठा’ सारख्या मित्रपक्षांना सन्मानाने सोबत घेऊन सत्तेचा समतोल (सव्वा-सव्वा वर्ष) साधला.

Maharashtra politics : देवेंद्र फडणवीसांचा रात्रीचा गुप्त दिल्ली दौरा, पहाटे मुंबईत परतले!

दूरदृष्टी अन् सूक्ष्म नियोजन
सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवडणूक केवळ एक राजकीय स्पर्धा म्हणून न पाहता, चंद्रपूरच्या २०४७ च्या विकास आराखड्याचा पाया म्हणून पाहिली. त्यामुळेच, आज महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकत असताना त्यामागे मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीचे आणि सूक्ष्म नियोजनाचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट होते.