Chandrapur Politics : निधी आणल्याचा दावाच नाही, तर मग श्रेय कशाला घेता ?

The funds were brought by Sudhir Mungantiwar, which was later confirmed : निधी सुधीर मुनगंटीवार यांनीच आणला, नंतर त्याची पुष्टीही झाली

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुसच्या जवळच असलेल्या पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या भक्त निवासाचे लोकार्पण नुकतेच राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. पण दुसऱ्याच दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या समर्थकांसह जाऊन पुन्हा त्याच भक्तनिवासाचे लोकार्पण केले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांसह जनसामान्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या भक्त निवासाचे निर्माण करण्यासाठी शब्द दिला होता. ‘दिला शब्द – केला पूर्ण’, ही त्यांची ख्याती आहे. त्याचप्रमाणे त्यांनी भक्तनिवासाच्या कामाला गती दिली. पंचमुखी हनुमान मंदिर हे तिर्थक्षेत्र ‘क’ वर्गात मोडत असल्यामुळे तेथे निधी आणणे अडचणीचे ठरले होते. अशा वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष बाब म्हणून दीड कोटी रुपयांचा निधी आणला.

Harshawardhan Sapkal : नवीन मित्र जोडण्याची गरज वाटली, म्हणजेच पायाखालची वाळू सरकली !

आमदार मुनगंटीवार यांनी घोषणा केल्यानंतर निधी येताच भक्त निवासाचे बांधकाम सुरू करण्यात आले आणि नुकत्याच झालेल्या हनुमान जयंतीला त्याचे लोकार्पणही एका छानदार सोहळ्यात केले. हा निधी सुधीर मुनगंटीवार यांनीच आणला, त्याची पुष्टीही झाली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्याचा उल्लेखही आला आहे. दुसरीकडे आमदार जोरगेवार यांच्या गोटातून निधी आणल्याचा दावा करण्यात आलेला नाही.