Chandrashekhar bawankule : कंपनीला द्यावे लागतील 20 लाख रुपये!

 

20 lakh assistance to the relatives of those killed in the blast : चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश; कोतवालबड्डी दुर्घटनेतील कुटुंबीयांचे केले सांत्वन

Nagpur काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स या कंपनीमध्ये दि. १६ फेब्रुवारी रोजी स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर तीन कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनास्थळी आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मृतांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी कंपनीला दिले.

चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. जिल्ह्यातील स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्या सुरक्षिततेचे पालन करीत आहे की नाही याची काटेकोरपणे तपासणी करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील सर्वच स्फोटके निर्मिती करणाऱ्या २३ कंपन्यांच्या सुरक्षिततेची संबंधित यंत्रणेने काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे. स्फोटक निर्मिती कंपन्या या सदैव आव्हानात्मक परिस्थिती स्वीकारून तत्पर असायला हव्यात.

Chandrashekhar Bawankule : पहिले सदस्य वाढवा, मग संघटनात्मक निवडणुका!

 

त्यामुळे अशा अस्थापनांनी सुरक्षेची अतिशय काळजी घेण्याची गरज असते. वारंवार जर अशा घटना घडत असतील व यात जीवितहानी होत असेल तर संवेदनशील शासन म्हणून अशा घटना पुढे होऊ नयेत यासाठी तपासणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.

मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीतर्फे २० लाख तर जखमींना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले. यासोबतच शासन नियमानुसार आवश्यक मदत देण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला!

कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमानुसार पीएफ उपलब्ध करून द्यावा, कुठल्याही कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे, पोलीस अधिकारी नरेश म्हस्के, कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्वल लोया, तहसीलदार राजू रणवीर यांच्यासह कामगार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.