Breaking

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांच्या बनावट लेटरहेडवर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले पत्र !

A letter was sent to the District Collector on a fake letterhead of Revenue Minister Chandrashekhar Bawankule : राजमुद्राही छापली; ओएसडींच्या सतर्कतेमुळे उघडकीस; गाडगेनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद

Amravati : राज्याचे महसूलमंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने बनावट लेटरहेड तयार केले. बनावट स्वाक्षरीसह जिल्हाधिकाऱ्यांना एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्याचे पत्र पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) योगेश कोठेकर यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २ एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र (एनसी) गुन्हा नोंदविला आहे.

अज्ञात व्यक्तीने महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले. मोर्शी येथील एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्यासंदर्भातील हे पत्र बनावट स्वाक्षरीसह तयार करण्यात आले होते. टपालाद्वारे हे बनावट पत्र पाठवण्यात आले.

Harish Pimpale : भाजप आमदारावर आली होती आंदोलनाची वेळ; अधिकाऱ्यांमुळे टळला प्रसंग

१ एप्रिल रोजी नियोजन भवनात कार्यालयीन कामकाज सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून एक लेटरपॅड पालकमंत्र्यांच्या कार्यालयात आले. योगेश कोठेकर यांनी सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पत्रावर चंद्रशेखर बावनकुळे यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली होती. तसेच, मध्यभागी “मंत्री, महाराष्ट्र राज्य” अशी राजमुद्राही छापण्यात आली होती. याची खात्री झाल्यानंतर कोठेकर यांनी तात्काळ पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकार स्पष्ट केला. त्यानंतर त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काय आहे पत्रात?
बनावट लेटरहेडची झेरॉक्स प्रत १० मार्च रोजी टपालाद्वारे प्राप्त झाली होती. त्यावर अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचा शिक्का आहे. वरूड नगरपालिकेतील कर्मचारी गौरव इंगोले यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. या लिपिकाने वरिष्ठांच्या शिफारसीमुळे परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका विभागात डेप्युटेशन मिळवले. मात्र, तो तेथेही अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. नागरिकांचे फोन न उचलणे, दादागिरीची भाषा वापरणे आदी वर्तनामुळे त्याच्या बदलीची मागणी पत्रात करण्यात आली होती.

Shiv Sena : बॅनरवर आनंद दिघे म्हणून चक्क अभिनेते प्रसाद ओकचा फोटो!

पोलीस तपास सुरू..
पालकमंत्र्यांचे ओएसडी योगेश कोठेकर यांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात २ एप्रिल रोजी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.