A separate DCP office will be established in Kamathi : स्वतंत्र पोलीस उपायुक्त कार्यालय उभारले जाणार
Nagpur पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कामठी मतदारसंघासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वाढते शहर आणि वाढते गुन्हे या दोन्हींचा विचार करून आता कामठीमध्ये स्वतंत्र पोलीस उपायुक्त कार्यालय स्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता कामठी व आसपासच्या भागातील गुन्हेगारांवर थेट वचक ठेवणे शक्य होईल, असं बोललं जात आहे.
कामठी शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. या विस्ताराला योग्य सुरक्षा व दिशा देण्याच्या दृष्टीने अद्ययावत सर्व सुविधापूर्ण स्वतंत्र पोलिस उपायुक्त कार्यालय उभारले जाणार आहे. या कार्यालयात कामठीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कंट्रोल रूम, वॅार रूम, एसीपी कार्यालय, पोलिस स्थानक, पार्किंगच्या सुविधेसह आदर्श ठरेल या पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश बावनकुळेंनी दिले.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी ठणकावले, तक्रार आली तर पोलीस कारवाई करेन
सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे कामठी मेट्रो फेज २ विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नवीन कामठी पोलिस मेट्रो स्टेशनच्या प्रस्तावाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तळमजला अधिक दोन मजले अशा स्वरूपात नवीन पोलिस उपायुक्त कार्यालय उभारले जाईल. याच्या निधीबाबत मेट्रोच्या निकषानुसार उपलब्धता करून देण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी मेट्रोला दिले. प्रस्तावित कन्हान मेट्रो विस्तारीकरणाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
Chandrashekhar Bawankule : प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ !
कन्हानमध्ये व्यापारी संकुल
कन्हान येथे प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी कामठी नगरपरिषदेच्या जागेचा योग्य विनियोग व्हावा. स्थानिक व्यापा-यांना व्यवसायासाठी संधी उपलब्ध व्हावी. यादृष्टीने मेट्रो स्टेशनच्या बाजुला बाजुला एकत्र व्यावसायिक संकुल उभारण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
असे असेल व्यापारी संकुल
व्यापारी संकुल दहा मजली असावे. यात दोन मजले हे पार्किंगसाठी, एक मजला आटोमोबाईल सेक्टर, दुसरा मजला कापड बाजारपेठ, भाजीपाला मार्केटसाठी स्वतंत्र मजला यासह इतर व्यावसायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.