Breaking

Chandrashekhar Bawankule : विधानपरिषदेसाठी बावनकुळेंना ‘चढवला’ मुकूट?

Bawankule was ‘crowned’ to get seats in the Legislative Council : माजी राज्यमंत्र्यांच्या भूमिकेवर राजकीय चर्चांना उत

Amravati महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोनेरी मुकुट देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी त्यांना हा मुकुट भेट दिला. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेल्या या सोन्याच्या मुकुटाची राजकीय वर्तुळात चांगले चर्चा सुरू आहे. विधानपरिषद आणि मंत्रिपदाच्या आशेपोटीच प्रवीण पोटे यांनी मुकूट दिल्याचे बोलले जात आहे.

सोन्याच्या मुकुटावरून राजकीय चर्चांना एकीकडे ऊत आला आहे. दुसरीकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे फळ असल्याचे सांगितले. हा मुकुट भाजपच्या कार्यकर्त्यांना अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा मुकुट अमरावती शहर भाजपच्या स्वाधीन केला आणि त्यातून मिळणारी आर्थिक रक्कम समाजोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करण्याचे निर्देश दिले.

Akash Fundkar बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ

अमरावती भाजपच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनोखा निर्णय जाहीर करण्यात आला. बावनकुळे यांनी केलेल्या या कृतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि त्यांनी नेतृत्वाचा आगळावेगळा आदर्श प्रस्थापित केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

अमरावती भाजपमध्ये अंतर्गत कलाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती जिल्हा दौरा केला. या दौऱ्यात पक्षातील अंतर्गत मतभेद कुठेही दिसू नये या दृष्टिकोनातून भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, यावेळेस काही महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने त्याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.

Chandrashekhar Bawankule : जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी ठोस पावले

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी ‘गंगा सावित्री’ या राणांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या कार्याचे कौतुक केले. एवढेच नव्हे, तर जिल्ह्याला राणांच्या रूपाने विकासाभिमुख नेतृत्व मिळाल्याची पुस्तीही जोडली. ‘गंगा सावित्री’ निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळेंच्या आगमनाप्रीत्यर्थ राणा दाम्पत्याने त्यांचा जाहीर नागरी सत्कार केला.

आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नाने पुणे येथील अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुंटुबीयांना प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे १५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते कुंटुबीयांना ही रक्कम वाटप करण्यात आली. यावेळी जगदीश गुप्ता, श्रीकांत देशपांडे, रमेश बुंदिले, प्रमोद कोरडे, लप्पी जाजोदिया, सुनील काळे, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, विनोद जायलवाल, कमल किशोर मालानी, साई राजेश मोरडिया आदी उपस्थित होते.