Breaking

Chandrashekhar Bawankule : आता तरी राहुल गांधींचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे !

 

BJP leader criticizes Rahul Gandhi for condemning Savarkar : सावरकरांची निंदा करणे सर्वार्थाने चुकीचे

Nagpur : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारावास भोगला. देशाला प्रेरणा दिली. अशा थोर व्यक्तीच्या विरोधात राहुल गांधी सातत्याने वाईट शब्दांत बोलत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकार लगावली आहे. आता राहुल गांधींचं डोकं ठिकाणावर येईल. त्यांनी देशाची, महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी आज (२६ एप्रिल) कोराडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे साथ देतात. आदित्य ठाकरेंनी तर राहुल गांधींना मिठीही मारली, हे सर्व महाराष्ट्र बघतो आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारले असता, त्यांनी युती करणे न करणे हा त्यांचा विचार आहे, त्यांचा अधिकार आहे. ते त्यांचं बघतील. आमचा पक्ष मजबूत करणे हे आमचे काम आहे.

Chandrashekhar Bawankule : वडेट्टीवारांच्या आरोपाला बावनकुळेंचे उत्तर; म्हणाले, श्रेयवाद नाहीच..!

शरद पवारांनी राजकारण करू नये..
पहलगाम येथील हल्ल्ल्यात २८ परिवारांचे छत्र हरवले. त्यावर शरद पवारांनी राजकारण करू नये. त्यातल्या एकाशी तरी शरद पवार भेटले का, असा सवाल करत मतासाठी त्यांनी राजकारण करू नये, असे बावनकुळे म्हणाले. काश्मीरमध्ये सीबीआय, एनआयए यांसारख्या मोठमोठ्या संस्था काम करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाने या संस्थांच्या पाठीशी राहून त्यांचे मनोबल वाढवण्याची गरज आहे. केवळ हल्लेखोरच नाही, तर मास्टरमाईंडला शोधून कारवाई करायची आहे. त्यासाठी सर्वांची साथ लागेल, असेही ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : बदललेल्या सकारात्मक वातावरणाला गालबोट लावले !

पाकिस्तान्यांना देश सोडावाच लागेल..
पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी केंद्र सरकारने मुदत दिली आहे. आता त्यांना आश्रय मिळता कामा नये. भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणे, पाकिस्तान क्रिकेट मॅच जिंकल्यावर भारतात फटाके फोडणे, हे प्रकार आता अजिबात चालणार नाहीत. केंद्र सरकारने योग्य भूमिका घेतली आहे. आता देशातील, महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षीत आयुष्य पाहिजे आहे, विकास पाहिजे आहे, टोमणेबाजी नव्हे. त्यासाठी राज्यातील लोकांनी फडणवीस सरकार निवडले आहे, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : विकास कामांसाठी वेळ मिळत नाहीये, आम्ही कशाला धमक्या देऊ ?

२०३४ पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री..
२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असे मंत्री बावनकुळे काल बोलले होते. याबद्दल विचारले असता. काही लोकांनी मला विचारले होते की तुम्ही मुख्यमंत्री केव्हा होणार? तेव्हा मी सांगितले की, २०३४ पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहणार. कारण ते गतीमान मुख्यमंत्री आहेत. १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांनी महाराष्ट्रात आणली. त्यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी मोठी गुंतवणूक आणली. त्यामुळे येथून पुढे १५ वर्ष महायुतीचेच सरकार राहणार, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.