Chandrashekhar Bawankule : काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ

Nana Patole’s statement on Operation Sindoor condemned : नाना पटोलेंच्या विधानाचा बावनकुळेंनी घेतला समाचार;

Nagpur काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरवर केलेल्या विधानाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे नाना पटोलेंनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा काँग्रेसवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केले आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankude : पंचायत राज सिस्टीम भक्कम, महसूल मंत्री बावनुकळेंची माहिती !

भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही असा सवाल बावनकुळे यांनी केला.

ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे. देशाच्या जवानांचे शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि भारत मातेच्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो?, असा सवाल बावनकुळेंनी केला.

Chandrashekhar Bawankude : मुंबईतील बनावट नकाशे दाखवून केलेली बांधकामे निष्कासित होणार !

तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या हे देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. नाना पटोले यांच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. त्यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाले आहेत, या शब्दांत बावनकुळे यांनी पटोले यांच्यावर हल्लाबोल केला.