Breaking

Chandrashekhar Bawankule : बाळासाहेब असते तर त्यांच्या बुडावर लाथच घातली असती !

Chandrashekhar Bawankule said that if Balasaheb Thackeray was there, he would have kicked his ass : विचार बुडवले, किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर तरी करु नये

Nagpur : ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडवले, किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर तरी करु नये. आज वंदनीय बाळासाहेब असते तर त्यांच्या बुडावर लाथच मारली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एआयच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात भाजपवर ताशेरे ओढले. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे संतापले आणि उपरोक्त प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांचा आवाज वापरून त्यांच्या विचारांचा द्रोह केला असल्याचा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. बाळासाहेबांचं संपूर्ण आयुष्य ज्याच्या विरोधात गेलं, त्याच विचारांच्या बाजूनं उबाठा गट सरसावला असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Amol Mitkari : महापुरुषाचा ठेका कोणत्याही लोकप्रतिनिधीने घेतलेला नाही !

यासंदर्भात त्यांनी X वर प्रतिक्रिया दिली. यामध्ये ते म्हणतात..
‘धिक्कार…!
आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो. मला खात्री आहे, आज ज्यांनी
बाळासाहेबांना जनाब ठरविले, ज्यांनी टिपू सुलतानाची नावे उद्यानांना दिली,
वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्‍या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले.

BJP Janata Darbar : भाजपच्या मंत्र्यांचा प्रत्येक महिन्याला प्रदेश कार्यालयात जनता दरबार !

वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसले, 370 रद्द करणार्‍याला विरोध करणार्‍यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले,
कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले’