Breaking

Chandrashekhar Bawankule : आता निवडणूक कार्यकर्त्यांची, ५१ टक्क्यांचा संकल्प करा !

Chandrashekhar Bawankule said that now election is of workers : आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना कार्यकर्ते निवडून आणायचे आहेत

Nagpur : नेत्यांच्या निवडणुका संपल्या, आता निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडली. आता जबाबदारी नेत्यांची आहे. नेत्यांची तशीच कार्यकर्त्यांचीही आहे. आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना कार्यकर्ते निवडून आणायचे आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

रविवारी (६ एप्रिल) भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त मंत्री बावनकुळे कार्यकर्त्यांना आभासी पद्धतीने संबोधित करत होते. ते म्हणाले, यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीच्या उमेदवारांना ५१ टक्के मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प करा. पुढील १५ वर्षे महायुतीचे सरकार असणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे हव्या.

Pune Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आज होणार सादर !

या आभासी कार्यकर्ता मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, महासचिव राजेश पांडे उपस्थित होते. याशिवाय राज्याच्या ३६ जिल्ह्यांतील प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. यावेळी बावनकुळे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला कमी मते मिळाली होती. त्यातून धडा घेऊन आपण विधानसभेच्या निवडणुकीत आपण ती कसर भरून काढली.

Mahayuti Government : अंगणवाड्यांचं रुपडं पालटणार, डागडुजी होणार!

विधानसभेच्या निवडणुकीत आपण विजयाचा संकल्प केला होता. त्यामुळेच हा मोठा विजय शक्य झाला. भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. अगदी त्याप्रमाणेच आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचा संकल्प करायचा आहे. आपण १ कोटी ५१ लाख सदस्यसंख्या केली आहे. यासाठी भाजपच्या एक लाखापेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. हीच मेहनत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही करा, असे आवाहन बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.