Breaking

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे हिंदीसाठी राज ठाकरेंना करणार विनंती !

Chandrashekhar Bawankule will request Raj Thackeray for Hindi language : नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एखादा विषय आला असेल तर काय बिघडलं?

इयत्ता पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे. यासंबंधीचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण केंद्र सरकारने तयार केले आहे. येत्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन सत्रापासून हे धोरण लागू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पण त्यापूर्वीच केंद्र सरकारच्या या धोरणाला फटाके लावणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी हींदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे मराठी अस्मितेसाठी केव्हाही ‘खळ खट्याक..’ करायला तयार असतात. हिंदी भाषेची सक्ती केल्यानंतर त्यांनी ‘..तर संघर्ष अटळ आहे’, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात आज (१९ एप्रिल) राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे समजदार नेते आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. एका विषय नॅशनल एज्युकेशन पॉलीसीमध्ये आला असेल तर त्याला सामावून घेतले पाहिजे.

Neelam Gorhe : ‘शिवसेना शिंदे गट’ नव्हे, शिवसेना आपलीच !

शिक्षण धोरणामध्ये आणखी एका भाषेचा समावेश झाला तर त्यात काय बिघडलं? मराठी पण त्यात आहेच ना. राज ठाकरेंनी पुढे यावे आणि हा विषय समजून घ्यावा. यासंदर्भात मी त्यांना भेटून विनंती करणार आहे. आम्ही सर्व मिळून मराठी भाषेला पुढे घेऊन जाऊ. पण नॅशनल पॉलीसीदेखील लागू करावी लागेल. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.

Harshawardhan Sapkal : एकीकडे अभिजात दर्जा द्यायचा अन् दुसरीकडे हिंदीची सक्ती, दुटप्पीपणा चालणार नाही !

महाराष्ट्राची मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. मराठी भाषेत प्रत्येक व्यक्ती बोललाच पाहिजे. मराठी प्रत्येकाला आली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी भाषेतूनच सर्व कामकाज चालावं, असा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. काल (१८ एप्रिल) अनावधानाने मी हिंदीला राष्ट्रभाषा म्हणालो. हिंदी राष्ट्रभाषा नाही राजभाषा आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.