Despite the irregularities, Meditrina Hospital continues : पालकमंत्र्यांचा संताप; १५ दिवसांत चौकशीचे आदेश
Nagpur अनेक अनियमितता असूनदेखील नागपुरच्या पॉश भागातील इस्पितळ सुरूच असल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका आहे. या प्रकाराची माहिती अधिकाऱ्यांना असूनदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित इस्पितळाची १५ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मेडिकल हब मानण्यात येणाऱ्या नागपुरातील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नागपूर येथील मेडिट्रिना हॉस्पिटलकडे अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र नाही आणि इमारत बांधकामामध्ये अनियमितता असूनही हॉस्पिटल सुरू ठेवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील संबंधित उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, नगररचनाकार यांची नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत १५ दिवसांत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Chandrashekhar Bawankule, Ravindra Chavhan : ‘बावनकुळे सरांसोबत’ रवींद्र चव्हाण राज्याच्या दौऱ्यावर!
अनियमिततेसंदर्भात मेडिट्रिना हॉस्पिटलबाबत तक्रार प्राप्त झाल्याने अनुषंगाने बॉम्बे नर्सिंग ॲक्ट १९४९ नुसार हॉस्पिटलला नोटीस देऊन त्रुटींची पूर्तता करून घ्यावी, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मेडिट्रिना हॉस्पिटलमधील अनियमिततेबाबत आमदार विकास ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली होती.
या बैठकीस नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यांनी मेडिट्रिना बाबतच्या तक्रारीचा सविस्तर आढावा घेतला. इस्पितळ हे रुग्णांच्या सेवेसाठी असते. परंतु कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. बांधकाम अनियमितता अथवा अग्निशमन ना हरकत नसणे ही गंभीर बाब आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या हद्दीतील ग्रामपंचायतीत ६० लाखांचा घोटाळा!
एखादे इस्पितळ बंद करणे हा शासनाचा उद्देश नसून ते सुस्थितीत कार्यरत राहणे गरजेचे असल्याने त्यांना कायद्यानुसार नोटीस देऊन एका महिन्यात त्यातील त्रुटी पूर्ण करून घ्याव्यात. याचबरोबर नागपूर शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.








