Chandrashekhar Bawankule : कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात, अन् ती आम्ही करणारच !

Farm Loan Waiver Is in Our Manifesto, and We Will Deliver It : कर्ज घेऊन फार्महाऊस बांधलेल्यांना कर्जमाफी नाही

Nagpur : यावर्षी महाराष्ट्रावर निसर्ग कोपला. राज्याच्या ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवला. पूर परिस्थिती निर्माण झाली. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुूकसान झाले. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून निघाल्या. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पात्र क्षेत्राचा आढावा अजूनही सुरू आहे. सरकार पूर्मपणे अलर्ट आहे. अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळणारच, त्यात काही शंका नाही आणि कर्जमाफी तर आमच्या जाहीरनाम्यात आहे, अन् ती आम्ही करणारच, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.

सरकार देणार असलेली कर्जमाफी ही गरजू शेतकऱ्यांसाठी असेल. ज्यांनी कर्ज घेऊन शेतांत फार्महाऊस बांधले, त्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. जो वर्षानुवर्षे राबूनही कर्जबाजारी आहे, त्यालाच माफी मिळेल. यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करत आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Sports Complex in Nagpur : १०० कोटी खर्चून नागपुरात होणार अद्ययावत क्रीडा संकुल !

प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, या योजनेअंतर्गत राज्यात मंजूर झालेल्या ३० लाख घरांसाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक वाळू साठ्यातील १० टक्के वाळू स्थानिक ग्रामपंचायतीसाठी राखीव ठेवली जाईल. उर्वरित ९० टक्के वाळूचा लिलाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल.

OBCs’ Battle for Their Rights : तुमचे अर्थमंत्री आमच्याशी असे का वागतात ?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही महसूल मंत्री बावनकुळे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती म्हणून कशी तयारी करायची, जागावाटप कसे सांभाळायचे, यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या पातळीवर तसेच जिल्हा समित्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्या चर्चेअंती निर्णय घेतली जाईल.