Guardian Minister Chandrashekhar Bawankule congratulated the people of Amravati : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अमरावतीकरांच्या स्वप्नांनी घेतली भरारी
Nagpur : अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (डीजीसीए) एअरोड्रोम परवाना आज (१३ मार्च) मिळाला. यामुळे गेले अनेक वर्षांचे हवाई वाहतुकीचे अमरावतीकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. “अमरावतीकरांच्या स्वप्नाला पंख भरारीचे लागले’, अशा शब्दांत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावना व्यक्त केल्या.
पालकमंत्री बावनकुळे यांनी विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचा विशेष करून उल्लेख केला. या क्षणाची उत्कटतेने वाट बघणाऱ्या माझ्या अमरावतीकरांचे पालकमंत्री म्हणून मी मःनपूर्वक अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. गगनभरारी घेण्याचा अमरावतीकरांच्या स्वप्नांतील क्षण आता जवळ आला आहे. अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (डीजीसीए) एअरोड्रोम परवाना आज मिळाला.
Chandrashekhar Bawankule : पश्चिम विदर्भाची हवाई connectivity वाढणार!
अमरावती विमानतळावरून लवकरच जगभरात उड्डाणे सुरू होतील. नेता कणखर आणि दृष्टा असला की, स्वप्न वास्तवात उतरतात. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळ संबंधीच्या अनेक विषयांत लक्ष घातले. माळरानावरील विमानतळ ते आता उड्डाणापर्यंतच्या प्रक्रियेत मोलाचा पुढाकार घेतला. ते अमरावतीचे पालकमंत्री असतानाही त्यांनी यासंदर्भात अनेक बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री झाल्यावर सचोटीने पाठपुरावा केल्यानेच, आज केवळ अमरावतीच नव्हे, तर पश्चिम विदर्भातील सर्वांसाठी अभूतपूर्व अशी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असे बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : दिव्यांगांच्या घरी १५ वर्षे वीज बील येणार नाही!
मार्च २०२५ च्या अखेरीस विमान वाहतूक सुरू होणार आहे. प्रवास, व्यवसाय, पर्यटन व उद्योगाला चालना मिळून जनतेच्या इच्छा आकांक्षांना प्रगतीचे पंख फुटतील. विकासाला कवेत घेऊन जगावर स्वार होणारी ही उड्डाणे असतील. अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अमरावतीकरांचे मनापासून अभिनंदन करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.