Chandrashekhar Bawankule : खुफिया यंत्रणा आहे तरी कुठे? पोलिसांचा धाक संपलाय का?

Guardian Minister holds hour-long meeting on law and order : पालकमंत्री बावनकुळे यांचा पोलिस प्रशासनाला सवाल; कायदा-सुव्यवस्थेवर तासभर जम्बो बैठक

Amravati शहरात लॉटरीआड ऑनलाइन जुगार, स्पा आड देहविक्री, एमडी ड्रग्जची तस्करी, बनावट दारूचा व्यवसाय, आणि ‘एरिया ९१’ रेस्टो बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींनी भरलेला फेक वेडिंग इव्हेंट — हे सगळं घडत असताना पोलिस प्रशासन गप्प का? खुपिया यंत्रणा आहे तरी कुठे? समाजात पोलिसांचा धाक राहिलाय का? असे परखड सवाल करत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार चंदू यावलकर, आमदार प्रवीण तायडे, माजी मंत्री प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची बैठकीला उपस्थिती होती.

बैठकीतील मुद्दे

एमडी तस्करीचे पाळेमुळे उखडली जात नाहीत, का?
वाढते खून आणि गुन्हेगारी — अधिक कठोर कारवाई आवश्यक
जुगार, मटका, स्पा आड देहव्यापार यावर पोलिसांची थेट कारवाई का नाही?
वाळू तस्करी रोखा, गुन्हेगारी थांबवा, सोशल अ‍ॅक्टिव्हिटी वाढवा
पोलिसांनी मीडियाशी संवाद वाढवावा, नागरिकांशी सुसंवाद ठेवावा

Chandrashekhar Bawankule : बायोमेट्रिक अथवा फेस अटेंडन्सशिवाय पगार नाही

“गुन्हेगारी वाढली तर गाठ माझ्याशी!” — पालकमंत्री

बावनकुळे म्हणाले, “अमरावती हे सांस्कृतिक शहर आहे. गुन्हेगारी फोफावत असेल, तर ती थांबवणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी नागरिकांमध्ये जाऊन सुसंवाद साधावा. सोशल अ‍ॅक्टिव्हिटी वाढवावी. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी.”