Guardian Minister’s displeasure with the administration’s work : पालकमंत्र्यांचे प्रशासनाला खडेबोल; जनसंवाद कार्यक्रमातील गर्दीवर स्पष्टीकरण
Nagpur लोक आपली कामे घेऊन सरकारी कार्यालयात जातात. पण एकतर त्यांची कामे होत नाहीत आणि त्यांना पाहिजे तसा प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळेच ते जनसंवाद कार्यक्रमाला गर्दी करतात. कामे झाली असती तर लोकांनी माझ्याकडे कशाला गर्दी केली असती, या शब्दांत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या जनता दरबारात वाढ झाली आहे. मात्र जनता दरबारात लोकांची गर्दी त्यांची कामे होत नसल्यानेच होत असल्याची बाब लक्षात आल्यावर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी अधिकाऱ्यांवर आगपाखड केली.
Maharashtra Government : मी स्वतः फोन करून सरकारच्यावतीने त्यांची माफी मागितली !
शासन स्तरावरील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत या उद्देशाने रविवारी नियोजन भवन येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. लोकांचे प्रश्न त्या त्या स्थानिक पातळीवर, संबंधित कार्यालयाद्वारे त्वरित मार्गी लागली तर जनसंवादाला लोकांना यायची वेळच पडणार नाही या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या.
तसेच नियमात असणारी कामे तत्काळ मार्गी लागलीच पाहिजेत. यात दिरंगाई होता कामा नये, असे निर्देशही दिले. ज्या संवेदनेने शासन तळागाळातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्व घटकासाठी योजना आखते, शासन निर्णय काढते, लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मदतीसाठी तत्पर राहते ती तत्परता प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्ययास आली पाहिजे.
लोकांची कामे तत्काळ व्हावी ही अपेक्षा चुकीची नाही. प्रत्येक नागरिकांचे शासनाशी सदैव काम पडते असेही नाही. अनेक शेतकरी नैसर्गिक आव्हानाशी तोंड देत झालेले नुकसान त्याला सोसता यावे. यात काही मदत मिळावी म्हणून शासनाकडे येतात. तहसील कार्यालयाशी संपर्क साधतात. असे त्यांनी सांगितले.
Maharashtra Navnirman Sena : चिखलीत 4.50 कोटींचा सिंचन विहीर घोटाळा?
यावेळी नागरिकांनी पांदन रस्ते, शेतजमिनीवरील अतिक्रमण, घरकुल योजना, पाणी समस्या, आरोग्य ,समस्या, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक व महसूल संबंधित अशा अनेक विषयांवर निवेदने देऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधला.