If the allocated funds are not utilized, direct action will be taken : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला सुनावले, आरोग्य, शिक्षणावर भर
Amravati जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीतून यावर्षी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षा या क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन व विकास निधीबाबत बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, अमर काळे, आमदार धीरज लिंगाडे, संजय खोडके, उमेश यावलकर, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, केवलराम काळे, प्रताप अडसड, सुलभा खोडके, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, जिल्हा अधीक्षक पोलिस विशाल आनंद, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते.
Statement against PM : “जितनी गालियां दोगे, उतना कमल खिलेगा”
पालकमंत्री म्हणाले, “विकसित भारताचे ध्येय ठरविले गेले आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विकासासाठी आराखडा तयार करून उत्कृष्ट दर्जाची कामे केली जाणार आहेत. कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई होईल.”
नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. यासाठी गृह विभागाचा मार्वल कंपनीसोबत करार होणार आहे. एमडी ड्रग्ज विक्री आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलिसांना कडक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. परवानाधारक हॉटेलांनी वेळेचे पालन न केल्यास 24 तासांत परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल.
महत्त्वाचे निर्णय
अहिल्यादेवी होळकर तिनशेव्या जयंतीनिमित्त गौरव अभियान
जिल्हा नियोजन निधीतून 1% वृक्षलागवडीसाठी राखीव
मेळघाट आरोग्य परिक्रमा राबवून तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबिरे
सुपर स्पेशालिटीमध्ये आयसीयू, रक्तपेढी, रेडिएशन सेंटर उभारणी
मनपा आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम आणि पायाभूत सुविधा
महत्त्वाची कामे
रेल्वे पुलासंदर्भात तातडीची उपाययोजना; रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा
पुलाची दुरुस्ती करून हलकी वाहने आणि पादचारी यांच्यासाठी खुला करण्याचा विचार
चिखलदऱ्यातील स्कायवॉक एप्रिलपर्यंत पूर्ण; चार इको टुरिझम स्पॉट विकसित करण्याचे नियोजन
निधी खर्चाचा डेडलाईन
Tiger in BJP – Congress : पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द !
15 सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मान्यता आणि 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण निधी खर्च करायचा आहे. निधी खर्च न केल्यास संबंधित अधिकारी व विभाग प्रमुखांवर कारवाई तसेच निधी पुनर्विनियोजनाद्वारे इतर विभागांना दिला जाणार आहे. “यंत्रणांनी दक्ष राहून दिलेला निधी प्राधान्याने खर्च करण्याचे प्रयत्न करावेत,” असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.