Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला!

Interaction with workers in BJP’s ‘Sanghatan Parv’ : ‘संघटन पर्व’ कार्यशाळेत संघटनात्मक विस्तारावर चर्चा

Akola अकोला येथे आयोजित ‘संघटन पर्व’ कार्यशाळेत भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने कार्य करावे, असे आवाहन महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कामगार मंत्री व पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, पक्षाचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, आमदार वसंत खंडेलवाल, माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांसह पक्षाचे अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tukaram Bidkar : एक कर्तृत्ववान शिक्षक, अभिनेता आणि जमिनीशी जुळलेला नेता!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याला ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार सदस्य नोंदणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कार्यशाळेत वरिष्ठ नेत्यांनी बूथ पातळीपासून संघटनात्मक बळकटी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अमरावती विभागातील सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील विस्तार योजनांवर चर्चा करण्यात आली. पक्षाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

Encroachment at Mahagaon removed : बेघर कुटुंबांनी स्मशानात काढली रात्र!

या कार्यशाळेत अकोला शहर व ग्रामीण, बुलढाणा, अमरावती शहर व ग्रामीण, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, जिल्हा व मंडळ पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, महिला, युवा, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व अल्पसंख्यांक आघाडीचे सदस्य सहभागी झाले होते.