Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, ‘निष्ठावान असाल, तर बॅनरवर नव्हे, कार्यक्रमात हजर राहा’

 

Internal politics in Amravati BJP on the rise : सत्ता आली, पण धुसफुस संपली नाही; पोटे-बोंडे वाद प्रदेशाध्यक्षांपुढे उघड

Amravati भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अनिल बोंडे Anil Bonde आणि महानगराध्यक्ष प्रवीण पोटे Pravin Pote यांच्यातील अंतर्गत वाद आता थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच उघड झाला. अमरावतीत झालेल्या अधिकृत कार्यक्रमात बावनकुळे यांनी दोन्ही गटांच्या समर्थकांचे कान टोचत स्पष्ट शब्दांत शिस्तीचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले होते. यामध्ये अनेक बॅनर्सवर केवळ खासदार बोंडे यांचे फोटो नव्हते. त्याचदरम्यान, बोंडे समर्थकांनी बावनकुळे यांना वारंवार संपर्क साधत खासदार बोंडे यांचे फोटो बॅनरवर नसल्याची तक्रार केली. यामुळे संतप्त झालेल्या प्रदेशाध्यक्षांनी कार्यक्रमात भाषणाच्या वेळी दोन्ही गटांना फटकारले.

“फोटो बॅनरवर झळकावून निष्ठा दाखवू नका. निष्ठावान कार्यकर्ते असतील तर थेट कार्यक्रमात हजर राहा. पक्षासाठी काम करा, एकनिष्ठ राहा,” असा थेट संदेश देत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे दिले.

Chandrashekhar bawankule : बावनकुळेंनी सुनावले, जनतेपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा

या वक्तव्यामुळे प्रवीण पोटे आणि अनिल बोंडे यांच्यातील वादावरून पक्षांतर्गत अस्वस्थता अधिकच वाढली आहे. यापूर्वीही दोघांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत्या. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीतच हा वाद उघड झाल्याने आता ही बाब वरिष्ठ नेत्यांच्या दृष्टीस पडली आहे.

Chandrashekhar Bawankule : ‘हेलिकॉप्टर शॉट लावतो’, म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांना बावनकुळेंचा दणका !

महत्त्व वाढवून घेण्यासाठी
राज्यात आणि केंद्रात भाजपच्या नेतृत्वात सत्ता आहेत. त्यातही महाराष्ट्रात तर अभूतपूर्व यश भाजपला मिळालं आहे. सर्वाधिक जागा जिंकल्या, सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा अधिकार मिळवला. पण त्यामुळे पक्षातील नेत्यांमधील अंतर्गत धुसफुस काही थांबलेली नाही. या एकूणच परिस्थितीत प्रत्येक नेता आपलं महत्त्व वाढवून घेण्यासाठी धडपडत आहे, असेच दिसते.