Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींनाही लवकरच मिळतील पैसे
Nagpur News : महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधीही झाला. पण प्रजासत्ताक दिन आठवडाभरावर आला असतानाही पालकमंत्र्यांची निवड झालेली नाही. सत्ताधारी नेते त्यासाठी ‘तारीख पे तारीख’ आहेत. पण आता २६ जानेवारीपूर्वी पालकमंत्री निवडले जातील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
शुक्रवारी १७ जानेवारीला मंत्री बावनकुळे नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, फार जास्त वाट पहायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. ते लवकरच निर्णय घेतील. सरकार महायुतीचे असल्याने सर्वांचे एकमत करावे लागते. आज विविध विभागांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याबाबत विचारले असता, मार्चमध्ये राज्य सरकारचा अर्थसंकल्प आहे. जे काम प्रस्तावित केले जातात, त्याचा बजेट आम्ही प्रस्थापित करतो. म्हणून येणाऱ्या बजेटकरिता नागपूर जिल्ह्यातील काय मागणी आहे, याचा आढावा घेत आहोत, असे ते म्हणाले.
Ravikant Tupkar : सिंचन विहीरीच्या मंजुरीसाठी पैसे मागणाऱ्यांना झोडपून काढा !
पारधी समाजाच्या मागण्यांसंदर्भात कार्यवाही सुरू आहे. आजच त्यासाठीही बैठक घेत आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पारधी समाजाच्या लोकांना जाणीवपूर्वक जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केली असेल, त्यांच्यावर कारवाई करणार आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत विचारले असता, उच्च न्यायालयात एखादी केस असते, तेव्हा उच्च न्यायालय सरकारला काही बाबी विचारत असते. सरकार योग्य वेळी त्याचे उत्तर देत असते. या ठिकाणी जे काही धोरण बदलले असेल तर सरकार त्याचे उत्तर देईल, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.
उद्या शनिवारी होणाऱ्या संघाच्या बैठकीबाबत ते म्हणाले की, आम्ही निवडून आल्यावर आमचं दायित्व असतं की सामाजिक न्याय, आदिवासी विभाग आदींचे जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर चर्चा होत असते. उद्या आमच्या सर्व मंत्र्यांचा परिचय होईल. आम्ही काय करू शकतो? जिथे सरकार पोहोचले नाही, तिथे सरकार कसं पोहोचेल, याबाबत चर्चा होईल. ही मार्गदर्शनपूर्ण बैठक असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी उद्याच्या बैठकीचा बैठकीचा काही संबंध नाही, सरकार आल्यावर मंत्र्यांची बैठक आणि जी आश्वासने दिली होती, त्याची टाईम लाईन काय, यावर चर्चा होईल.
Right to Education : १ हजार २९१ विद्यार्थी ठरतील आरटीईचे लाभार्थी!
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्यासंदर्भात बोलताना ज्या काही घटना होतात, त्याला आम्ही सिरीयसली घेत आहोत. आमचा प्रतिसाद लवकर असतो. अंबानींच्या घरासमोर जे झालं, तशीही सरकार आम्ही पाहिली आहे. महाराष्ट्रात मुंबई सुरक्षित आहे. मुंबई पोलीस अलर्ट आहेत. एखादी घटना झाल्यावर पोलीस लवकर ॲक्शन मोडवर येतात, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
हिंदू महासभेवर काही लोकांनी आरोप केले आहेत. जातीयवादाचे विष पेरण्याकरिता काही संघटना काम करतात. आम्ही जातीयवादी किंवा कुठल्या उद्देशाने अशा घडना घडल्या किंवा घडवल्या, हे सामोर आणू. फालतू वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणे आणि महाराष्ट्राला अशांत अशांत करण्याचा काहींचा प्रयत्न आहे, तो आम्ही हाणून पाडू, असे सांगतानाच लाडक्या बहीणींना २६ जानेवारीच्या आत पैसे मिळणार आहेत, असेही ते म्हणाले.
Collectorate of Buldhana : सातबाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ऑनलाईन करा अर्ज!
बीड प्रकरणी ज्या पद्धतीने आतापर्यंत कारवाई होत आहे. बंदुकीच्या लायसन्सवरही कारवाई झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे आता बीडची काळजी करण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रश्न केला असता, हे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. सरकार हे सपोर्ट करेल. जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल, त्यानंतर सर्व तयारी करणार. जसा निकाल येईल त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका जिल्हा परिषद येथे निवडणुका घेऊ. राज्य निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर टाईम लाईनवर निवडणुका व्हाव्या, अशी आमची विनंती असेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.