Chandrashekhar Bawankule : गणोशोत्सवानंतरही आंदोलन करता आलं असतं !

Manoj Jarange could have protested even after Ganesh Utsav : ज्या राजकीय पक्षांनी समर्थन दिलं, त्यांनीही विचार करायला हवा

Nagpur : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे. या आंदोलनासाठी त्यांनी गणेशोत्सवाची निवड केली. ही बाब अनेकांना रुचलेली नाही. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण त्यासाठी वेळ, काळ, उत्सव बघितले पाहिजे. मनोज जरांगेंना गणोशोत्सव झाल्यावरही आंदोलन करता आलं असतं, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

यासंदर्भात नागपुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कुणाचीही ना नाही. आमचे सरकार त्यासाठी काम करत आहे. १८ पगड जाती ओबीसी समाजाला आरक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमचीही भूमिका आहे. पण त्यासाठी कुणी आक्रमक होऊ नये. हिंदुंच्या सर्वात मोठ्या उत्सवाला गालबोट लागू नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

Tribal Pardhi Society : आदिवासी पारधी कुटुंबावरच दाखल केले जातात खोटे गुन्हे !

उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. यामध्ये आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. गणेसोत्सवासाठी ते गेले असतील. प्रत्येक गोष्टीत राजकारण बघणे योग्य नाही. कुटुंब एकत्र येऊन उत्सव साजरा करत असेल, तर आनंदाची बाब आहे. गणोशोत्सवात बऱ्याच ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचे देखावे केले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रतिकृती तयार केल्या गेल्या असतील तर चांगली गोष्ट आहे. यामुळे सैनिकांची कामगिरी तरुण पिढीला कळेल. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त करून सैनिकांनी जो पराक्रम करून दाखवला, तोही जनतेला कळेल, असे बावनकुळे म्हणाले.