Breaking

Chandrashekhar Bawankule : राज्यातील शेत पाणंद रस्ते विकासासाठी मास्टर प्लान!

Master plan for development of farm roads : समितीच्या पहिल्याच बैठकीत योजनेच्या तयारीला गती

Mumbai राज्यातील ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाला हातभार लावण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी समग्र योजना Integrated Plan तयार करण्याच्या उद्देशाने गठीत करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ही योजना तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 च्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल व वन विभागाने अधिकृत शासन निर्णय काढून समिती गठीत केली आहे.

Ward structure in final stage : अमरावती जिल्हा परिषदेसाठी ५९ जागांवरच निवडणूक

या समितीत आमदार रणधीर सावरकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीत शेतकऱ्यांसाठी बारमाही आणि दर्जेदार शेत-पांदन रस्त्यांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. पेरणी, कापणी, मळणी आणि उत्पादन वाहतूक या कृषीक्रियांना गतिमान करण्यासाठी हे रस्ते अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

राज्यात यापूर्वी रोहयो योजनेंतर्गत विविध रस्ते प्रकल्प राबवण्यात आले, मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे या योजनांची पुनर्रचना करणे गरजेचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने तयार होणाऱ्या समग्र योजनेसाठी आराखडा आखण्यासंदर्भात बैठकीत सखोल चर्चा झाली.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी गावनिहाय नकाशे तयार करून आराखडा तयार करण्याचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकांनुसार रस्ते बांधण्याचे, रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांची उभारणी व वृक्षलागवड करण्याचे सुचवण्यात आले.

आमदार रणधीर सावरकर यांनी या बैठकीत पूर्वी राबवलेल्या योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. भविष्यातील योजना अधिक प्रभावी करण्यासाठी निधीची उपलब्धता, अंमलबजावणीची यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यावर भर देण्यात आला.

BARTI : अमरावतीत लवकरच होणार ‘बार्टी’चे उपकेंद्र

मंत्री रोहयो भरत गोगावले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आदी मान्यवरांनीही आपल्या सूचनांची मांडणी केली. योजनेच्या पुढील टप्प्यात अभ्यासगट नेमून त्यांच्याकडून शिफारशी मागवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. राज्यातील सर्व शेत पाणंद रस्त्यांचा एकत्रित विचार करून एकच परिपूर्ण आणि प्रभावी योजना तयार करण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.