MLAs will have to make ‘Jiwant Satbara’ a success : अंमलबजावणीसाठी बावनकुळेंचे आवाहन; शेतकऱ्यांची कुंचबणा थांबणार
Buldhana शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांना तलाठी आणि तहसील कार्यालयात नोंद करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. त्यात त्यांची आर्थिक आणि मानसिक कुचंबणा होते. हा त्रास कमी करण्यासाठी आमदार श्वेता विद्याधर महाले यांनी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांच्या सहकार्याने ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबवली. या मोहिमेला राज्यभरात राबविण्याचा शासन आदेश निघाला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात या योजनेचा शासन निर्णय जाहीर करताना या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्व आमदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच, या योजनेसाठी आमदार महाले यांनी पुढाकार घेतल्याबद्दल कौतुकही केले.
Chandrashekhar Bawankule : सरकार जर वाळू विकायला लागली तर कसे होईल ?
चिखली विधानसभा मतदारसंघात राबविलेल्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही मोहीम जिल्हास्तरावर राबविण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मोहीम राज्यभर राबवावी, यासाठी आमदार श्वेता महाले यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांना या प्रकल्पाबद्दल माहिती दिली होती.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा आपल्या मतदारसंघासाठी मोठा निर्णय
योजनेचा सखोल अभ्यास केल्यानंतर बावनकुळे यांनी तिच्या नाविन्यपूर्णतेचे कौतुक केले आणि २४ मार्च रोजी सभागृहात शासन निर्णय प्रसिद्ध केला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व आमदारांनी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपल्या मतदारसंघात या योजनेला प्रसिद्धी देण्याचे आवाहन महसूलमंत्र्यांनी केले. याचप्रमाणे, सभागृहात या योजनेवर चर्चा होऊन विरोधी पक्षानेही तिचे स्वागत केले. ग्रामीण आणि शहरी भागातील वारसांना सुटसुटीत आणि जलद वारसा नोंदणी प्रक्रियेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा काही सदस्यांनी व्यक्त केली.